फोटो सौजन्य: iStock
आपल्या घरी पाहूणे आल्यावर, तसेच वडीलधाऱ्यांना भेटल्यावर आपण सर्वजण नमस्कार किंवा प्रणाम करतो. याचा अर्थ असा की, त्यांच्याबद्दलचे आपल्या मनातील आदरभाव दर्शवणे होतो. पण प्रणाम आणि नमस्ते हे समान अर्थाचे दोन शब्द आहेत. मात्र याचे वास्तविक अर्थ एकमेकांपासून भिन्न आहेत. पण याबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर हे शब्द समान अर्थाचे आहेत, तर त्यांचे वेगवेगळे अर्थ कसे होतात?
तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, नमस्कार आणि प्रणाम यांचे अर्थ वेगवेगळे कसे. कोणत्या ठिकाणी वापरले कसे जातात. चला तर मग या दोन शब्दातील फरक जाणून घेऊयात.
नमस्काराचा अर्थ
नमस्ते किंवा नमस्कार या शब्दाचा विच्छेद नमः + अस्ते. असा होतो. नमः म्हणजे नतमस्तक आणि अस्ते म्हणजे अहंकाराने भरलेला. सोप्या शब्दात सांगायचे तर नमस्तेचा खरा अर्थ म्हणजे मानातील अहंकार कमी करून दुसऱ्या व्यक्ती पुढे हात जोडून झुकणे. समोरच्याप्रती आपला आदरभाव प्रकट करणे.
नमस्ते म्हणत असताना दोन्ही हात जोडलेले असतात, याचा अर्थ नमस्ते म्हटल्यावर दोन्ही व्यक्तीचे मन एका दिशेने केंद्रित होते. भारतीय संस्कृतीत नमस्काराला खूप महत्त्व दिले जाते. नमस्कार मुख्यत: वडीलधाऱ्या व्यक्तींना अभिवादन करण्यासाठी केला जातो. तसेच आपण देवासमोर आपला अहंकार बाजूला ठेवून नमस्कार करतो.
प्रणाम अर्थ
भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक व्यक्तीला ‘आदरणपूर्ण अभिवादन’, करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रणाम या शब्दाचा विच्छेद ‘प्रा’ + नामा असा होतो. प्रा म्हणजे समोर किंवा आधी आणि ‘नामा’ म्हणजे वाकणे. म्हणजे वडीलधाऱ्याला व्यक्तीला वाकून नमस्कार करून आशीर्वाद घेणे. आपल्या समोरच्या व्यक्तीबद्दल अधिक आदर दर्शवणे.
प्रणाम बोल्यावर कधीच परत प्रणाम बोलून उत्तर दिले जात नाही. म्हणून वडीधाऱ्या व्यक्तींकडून आशीर्वाद दिला जातो. तसेच प्रणाम नेहमी लहान व्यक्तीेंनी मोठ्यांना करतात.