फोटो सौजन्य: iStock
ग्लोबल ऑटो बाजरात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यातही लक्झरी कारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. खरंतर, लक्झरी कार म्हंटलं की सर्वात पहिले नाव मर्सिडीजचे येते. अनेक सेलिब्रेटी आणि मोठमोठ्या उद्योगपतींच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजच्या कार पाहायला मिळतात. नुकतेच कंपनीने Mercedes GLC EV ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. या एसयूव्हीमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स दिले आहेत? यातील बॅटरी आणि मोटर किती पॉवरफुल आहे? बाजारात लाँच झाल्यानंतर ती कोणत्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
मर्सिडीजने मर्सिडीज GLC EV ही नवीन इलेक्ट्रिक SUV म्हणून सादर केली आहे. ही SUV जर्मनीतील म्युनिक ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली आहे. ही EQE SUV चा उत्तराधिकारी म्हणून सादर करण्यात आली आहे आणि लवकरच ती लाँच देखील केली जाऊ शकते.
अरे बाप रे! एकीकडे GST कमी झाला असतानाच ‘या’ 5 बाईक्सच्या टॅक्समध्ये होणार वाढ
कंपनीकडून या SUV ला अनेक आकर्षक फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात 39.1-inch ची MBUX स्क्रीन देण्यात आली आहे, जी Mercedes ने आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी स्क्रीन आहे. यासोबतच LED lights, panoramic sunroof आणि 20-inch alloy wheels यांसारखी फीचर्स दिली आहेत.
या SUV मध्ये 94 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एका सिंगल चार्जवर ती 713 km पर्यंतची रेंज देते. फक्त 10 minutes चार्ज केल्यावर SUV ला 303 km पर्यंतची रेंज मिळते. तर 10% ते 80% चार्ज होण्यासाठी फक्त 24 minutes लागतात. यामधील मोटरमुळे SUV ला 489 HP power मिळते आणि याची टॉप स्पीड 210 km/hr आहे.
Tata Motors कडून ग्राहकांसाठी मोठी भेट! कमर्शियल गाड्यांच्या किमतीत मोठी कपात
सध्या या SUV ला फक्त सादर करण्यात आले आहे. पुढील काही काळात ती युरोप आणि अमेरिका येथे पहिली लाँच केली जाऊ शकते. भारतात लाँचबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अशी अपेक्षा आहे की ही SUV पुढील वर्षापर्यंत भारतातही दाखल होऊ शकते.
मर्सिडीजने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये GLC सादर केली आहे. लाँच झाल्यानंतर, ही कार BMW iX3 सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करेल.