(फोटो सौजन्य – Pinterest)
ही समस्या हिवाळ्यात जास्त वाढते कारण याकाळात शारीरिक हालचाली लक्षणीयरीत्या कमी होतात, लोक गोड आणि तळलेले पदार्थ जास्त पसंत करतात ज्यामुळे शरीरात चरबी साठू लागते. या सर्वांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. आपण काही हेल्दी पदार्थांचे सेवन करून शरीरात वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करू शकता. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट ख्याती पटेल यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे अशा हिवाळ्यातील पदार्थांची यादी शेअर केली जे शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात करण्यास मदत करतात.
हिवाळ्यात मेथी खा
हिवाळ्यात अनेक भाज्या स्वस्त होतात. या हंगामी भाज्यांचे सेवन शरीराला अनेक फायदे मिळवून देते. हिवाळ्यात जर तुम्ही मेथीचे सेवन केले तर ते शरीरात साठलेल्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास तुमची मदत करेल. मेथीमध्ये नैसर्गिक विरघळणारे फायबर असते, जे तुमच्या आतड्यांमधील पित्ताशी बांधले जाते, ज्यामुळे ते साठवलेल्या कोलेस्टेरॉलपासून पित्त आम्ल तयार करते. यामुळे तुमचे वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. मेथीमध्ये सॅपोनिन नावाचे एक संयुग देखील असते, जे तुम्ही खाल्लेल्या पदार्थांमधून कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करते. रोजच्या आहारात तुम्ही मेथीपासून अनेक पदार्थ बनवून खाऊ शकता जसे की, मेथी पराठा, लसूणी मेथीची भाजी आणि मेथी कढी.
हिरवा लसूण
पोषणतज्ज्ञांच्या मते, हिरवा लसूण हिवाळ्यातील एक असे सुपरफूड आहे ज्याविषयी अनेकांना फारशी माहिती नाही. जेव्हा तुम्ही हिरवा लसूण सोलता किंवा चिरता तेव्हा ते अलिसिन नावाचे संयुग सोडते. हे तुमच्या शरीरात स्टॅटिन औषधे ज्या एन्झाइमला लक्ष्य करतात त्याच एन्झाइमला लक्ष्य करते. हे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. यामुळे धमन्या ब्लॉक करू शकणारे ऑक्सिडाइज्ड एलडीएलचे प्रमाण देखील कमी होते. तुम्ही सॅलड किंवा भाज्यांमध्ये याचा समावेश करू शकता.
वाढत्या वयात शरीरातील अवयव होतात म्हतारे! जाणून घ्या कोणत्या अवयवांची क्षमता वयासोबत कमी होऊन जाते
आवळा तुमच्या आहाराचा एक भाग बनवा.
आवळ्याची ख्याती जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे. आवळ्यातील पोषकघटक शरीराच्या अनेक समस्यांना दूर करण्यास आपली मदत करते आणि यातीलच एक म्हणजे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणे. आवळा अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे लिव्हरमधील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास आणि ट्रायग्लिसराइडची पातळी कमी करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याची भाजी, लोणचे, रस आणि सॅलड समाविष्ट करू शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






