
उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यामुळे खरंच वजन कमी होत का? वेटलॉस करण्यासाठी 'या' पद्धतीने करा सेवन
वजन कमी करताना लिंबू पाणी प्रभावी ठरते का?
लिंबू पाणी पिण्याचे फायदे?
लिंबू पाण्यात कोणते घटक असतात?
Weight Loss Tips: आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाणी, लिंबू पाणी तर काहींना ब्लॅक कॉफी पिण्याची खूप जास्त सवय असते. या पेयांचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याच्या सेवनाने केल्यास शरीर डिटॉक्स होण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होईल. लिंबू पाणी शरीरातील विषारी घाण बाहेर काढून टाकते, आतडे स्वच्छ करते, वजन कमी करण्यास मदत करते इत्यादी अनेक फायदे लिंबू पाण्याच्या सेवनामुळे होतात. चयापचय वाढवणारे एक चमत्कारिक पेय म्हणून सोशल मीडियावर लिंबू पाण्याची मोठी क्रेझ आहे. लिंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर आहे, पण यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतीलच असे नाही. चला तर जाणून घेऊया लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे खरच वाढलेले वजन कमी होते का आणि लिंबू पाणी पिण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
Relationship Tips: मनातून नातं संपलंय की अजूनही अडकले आहात? Move On झाल्याचे ‘हे’ बदल नक्कीच ओळखा
पोटावर वाढलेला चरबीचा अनावश्यक थर कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. त्यात लिंबू पाणी सगळेच पितात. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे लगेच वजन सुद्धा कमी होत नाही आणि वेगाने चयापचय क्रिया सुद्धा सुधारत नाही. वजन कमी करणे तुमच्या शारीरिक हालचालींवर आणि दिवसभरात तुम्ही किती कॅलरीजचे सेवन करता, यावर अवलंबून असते. अनेकांना कोमट किंवा साधे पाणी पिण्याचा कंटाळा येतो, अशावेळी पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करून प्यायले जाते. साखरेचा चहा, गोड कॉफी, पॅक केलेले ज्यूस किंवा एरेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिण्याऐवजी लिंबू पाणी प्यायल्यात कॅलरीज कमी होण्यास मदत होईल.
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी लिंबू पाणी पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहते आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळते. तसेच उपाशी पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास आतड्यांमधील विषारी मल बाहेर पडून जाण्यास मदत होते. शरीराचे नैसर्गिक शुद्धीकरण करण्यासाठी लिंबू पाणी प्यावे. ॲसिडिटी, गॅस्ट्रायटिस किंवा संवेदनशील पोटाचा त्रास असलेल्या व्यक्तींना लिंबू पाणी प्यायल्यानंतर जळजळ किंवा अपचनाच्या समस्या वाढतात.
लिंबूमध्ये असलेल्या विटामिन सी मुले त्वचा उजळदार आणि चमकदार होण्यास मदत होते. विटामिन सी कोलेजन तयार करण्यास मदत करते. एक ग्लास पाण्यात दोन किंवा तीन चमचे लिंबाचा रस टाकून मिक्स करा. या पेयाचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन केल्यास शरीर आणि त्वचेला सुद्धा भरमसाट फायदे होतात. याशिवाय आवळा, पेरू, संत्री, बेरीज, टोमॅटो आणि भाज्यांचा आहारात समावेश करणे फार आवश्यक आहे. तसेच त्वचा कायमच सुंदर ठेवण्यासाठी पुरेशी झोप, सूर्याच्या किरणांपासून संरक्षण आणि शारीरिक हालचाली करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
Ans: फक्त लिंबू पाणी प्यायल्याने थेट वजन कमी होत नाही.
Ans: साध्या किंवा कोमट पाण्यात ताज्या लिंबाचा रस मिसळून प्यायले तरी पुरेसे आहे. त्यात साखर, सिरप किंवा जास्त मध घातल्यास कॅलरीज वाढू शकतात.
Ans: नाही. लिंबू पाणी सकाळीच किंवा उपाशी पोटी प्यावे असे बंधन नाही. दिवसभर पुरेसे पाणी पिणे अधिक महत्त्वाचे आहे.