
पाणी पिऊन शरीरावर वाढलेली चरबी कमी होते का? जाणून घ्या वॉटर फास्टिंग म्हणजे काय आणि २४ तासांमध्ये शरीराला होणारे बदल
वॉटर फास्टिंग म्हणजे काय?
वॉटर फास्टिंग केल्यामुळे वजन कमी होते का?
वॉटर फास्टिंग करण्याची पद्धत?
जगभरात लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. कधी आहारात बदल केला जातो तर कधी वेगवेगळे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध घेऊन वजन कमी केले जाते. शरीरावर जमा झालेल्या अनावश्यक चरबीमुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, सतत तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी वाढू लागते. शरीरात वाढलेल्या चरबीमुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. कोलेस्ट्रॉलसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका सुद्धा वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
वजन कमी करण्यासाठी हल्ली बाजारात नवनवीन ट्रेंड आले आहेत. सप्लिमेंट्स, महागड्या डाएटसोबतच वॉटर फास्टिंगचा अनोखा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर फॉलो केला जात आहे. वॉटर फास्टिंग ही शरीर रिसेट करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा अन्नपदार्थांचे अजिबात सेवन केले जात नाही तेव्हा शरीराला ऊर्जा देण्यासाठी पाण्याचे सेवन केले जाते. शरीर उर्जेसाठी बाह्य स्त्रोतांऐवजी साठवलेल्या चरबीवर अवलंबून राहतो. यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी झपाट्याने कमी होते आणि जुनाट गंभीर आजारांचा धोका कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया वॉटर फास्टिंग म्हणजे काय? यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती.
वॉटर फास्टिंग टप्प्यांमध्ये केले जाते. दिवसभराचे पाणी एकत्र पिऊन वॉटर फास्टिंग होत नाही. यासाठी विशिष्ट टप्पे फॉलो करावे लागतात. वॉटर फास्टिंग केल्यानंतर पहिल्या २४ तासांमध्ये शरीरातील ‘ग्लायकोजेन’ ची पातळी हळूहळू कमी होते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यानंतर लवकर वजन कमी होण्यास मदत होते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात थकवा अशक्तपणा जाणवू लागतो.जशी जशी शरीरातील साखरेची पातळी कमी होत जाते तेव्हा भूक लागते, चिडचिड होते, डोके दुखी इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
२ ते ३ दिवसानंतर शरीर ‘केटोसिस’ मोडमध्ये जाते. ज्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा हवी असल्यास चरबीचा वापर केला जातो. या टप्प्यामध्ये भूक लागणे कमी होते आणि वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होते. याशिवाय थकवा, चक्कर तर काहीवेळा तोंडातून दुर्गंधीसुद्धा येते. ३ दिवसांनंतर शरीरात पेशींच्या शुद्धीकरणाची अधिक तीव्र होऊन जाते. ज्यामुळे शरीरात जमा झालेली बाहेर पडून जाण्यासोबतच जळजळ कमी होण्यास मदत होते.
वॉटर फास्टिंग केल्यानंतर वजन झपाट्याने कमी होते असे नाही. सुरुवातीच्या ४८ तासांमध्ये शरीरातील मुख्य चरबी कमी होते. पण फास्टिंग सोडल्यानंतर चुकीचा आहार घेतल्यास चरबी झपाट्याने वाढू शकते. वॉटर फास्टिंग केल्यामुळे लिव्हर आणि किडनी डिटॉक्स होते. शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते.
Ans: वॉटर फास्टिंग म्हणजे ठराविक काळासाठी कोणतेही अन्न न खाता फक्त पाणी पिणे. साधारणपणे २४ ते ७२ तासांपर्यंत हे फास्टिंग केले जाते.
Ans: काही प्रमाणात वजन कमी होऊ शकते, कारण शरीरातील कॅलरी इनटेक कमी होतो. मात्र सुरुवातीला कमी होणारे वजन हे पाणी आणि ग्लायकोजनमुळे असते, थेट चरबीमुळे नाही.
Ans: २४ तासांमध्ये शरीरातील ग्लायकोजन कमी होऊ लागते आणि शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी फॅटचा वापर सुरू करू शकते. काहींना हलकेपणा जाणवतो, तर काहींना अशक्तपणा किंवा चक्कर येऊ शकते.