Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?

असं म्हणतात की भाताचं सेवन आरोग्यास हानिकारक आहे. मात्र भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत, कसं ते जाणून घेऊयात...

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 05, 2025 | 06:15 AM
भात खाल्याने आरोग्य बिघडतंं का ? भात कोणी आणि किती खावा, काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ ?
Follow Us
Close
Follow Us:

भात हा अनेकांचा जीव की प्राण आहे. जेवण म्हटलं की खूप जणांना भात खाल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. या भाताबद्दल अनेक समज गैरसमज आहेत भात कोणी खावा आणि किती प्रमाणात खायला हवं याबाबत विचार न करता सर्रासपणे भात खाणं चुकीचं आहे असा एकंंदरीतच समज झालेला आहे, नेमकं भात खाल्याने काय होतं किंवा त्याचा काय परिणाम होतो याबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

भात हा भारतीय आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः महाराष्ट्र, गोवा, बंगाल, केरळ, आणि दक्षिण भारतात भात हा प्रमुख अन्नप्रकार मानला जातो. भातामध्ये असलेले पोषणमूल्य अनेक प्रकारे आरोग्यास उपयुक्त ठरते. भात हा कार्बोहायड्रेट्सचा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दैनंदिन कामासाठी लागणारी ताकद टिकून राहते. विशेषतः सकाळी किंवा दुपारी खाल्लेला भात शरीरास दिवसभर ऊर्जा देतो, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

आहारात भात समाविष्ट केल्याने काय होतं ?

भात पचायला अत्यंत सोपा आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण भात सहज पचवू शकतात. पचनसंस्थेवर भार न टाकता तो झपाट्याने पचतो, म्हणूनच आजारी व्यक्तींना किंवा पाचनाच्या त्रासांनी त्रस्त असलेल्या लोकांना भात खाण्याचा सल्ला दिला जातो.भातात कोणतेही कोलेस्टेरॉल नसते, त्यामुळे तो हृदयासाठी सुरक्षित मानला जातो. तसेच तो ग्लूटन-फ्री (gluten-free) असल्याने ज्यांना गहू किंवा मैद्यापासून अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी भात हा एक उत्तम पर्याय ठरतो.

भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

भातात लोह, मॅग्नेशियम, आणि जीवनसत्त्वे (विटॅमिन्स) सुद्धा असतात, जे शरीराच्या एकूण विकासासाठी उपयुक्त ठरतात. भाताचे विविध प्रकार जसे की तांदूळ, ब्राउन राईस, व पोलिश न केलेला भात यामध्ये अधिक फायबर असते, जे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.शेवटी, भात हा स्वस्त, सहज उपलब्ध, आणि विविध प्रकारांनी शिजवता येणारा अन्नघटक आहे. त्यामुळे तो प्रत्येक घरात सहजपणे वापरला जातो.एकंदरीत, भात खाणे केवळ चवदार नाही तर आरोग्यदायी देखील आहे.

भात कोणी खाऊ नये

प्रत्येक पदार्थांचे काही ना काही चांगले वाईट परिणाम आहेत. एखाद्या पदार्थाचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा त्रास देखील होतो. भाताचे जसे फायदे आहेत तसंच काहींसाठी भाताचं अतिसेवन करणं नुकसान करणारं आहे. भात हा आरोग्यदायी असूनही काही विशिष्ट व्यक्तींनी भात खाण्यावर मर्यादा घालणे आवश्यक असते. प्रत्येकाच्या शारीरिक गरजा आणि आजारानुसार आहार निवडावा लागतो. खाली दिलेले काही गट अशा व्यक्तींचे आहेत, ज्यांनी भात खाणे टाळावे किंवा मर्यादित प्रमाणात खायला हवं.

1. मधुमेह (डायबेटीस) असलेले रुग्ण

साधा भात (पांढरा तांदूळ) यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्समध्ये जास्त असतो, हे घटक रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. त्यामुळे मधुमेह असलेल्यांनी साधा भात टाळावा किंवा ब्राउन राईस/फायबरयुक्त भात खाण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2. जास्त वजन असल्यास

भातामध्ये जास्त प्रमाणात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स असतात. दररोज जास्त प्रमाणात भात खाल्ल्यास वजन वाढू शक्यता असते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास भाताचं सेवन प्रमाण मर्यादित ठेवणे फायदेशीर आहे.

3. थायरॉईड व हार्मोनल समस्यांनी त्रस्त लोक

काही प्रकारच्या हार्मोनल आजारांमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. अशावेळी भाताचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.

4. रात्री भात टाळावा

रात्री भात खाल्ल्यास पचन मंद होते, त्यामुळे गॅस, अॅसिडिटी किंवा झोपेच्या त्रासाची शक्यता असते. त्यामुळे रात्री हलका आहार घेणे चांगले, असं आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

 

Web Title: Does eating rice affect health who should eat rice and how much what do health experts say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • health

संबंधित बातम्या

Teeth Whitening: दातांवर चढलाय पिवळट थर, मोत्यांसारख्या दातांसारखी ‘देशी’ जुगाड; तज्ज्ञांचा सोपा उपाय
1

Teeth Whitening: दातांवर चढलाय पिवळट थर, मोत्यांसारख्या दातांसारखी ‘देशी’ जुगाड; तज्ज्ञांचा सोपा उपाय

अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे
2

अनेक समस्या एक उपाय ; रोज उपाशीपोटी प्या तुळशीचं पाणी, होतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Satish Shah : झोपेची कमतरता आयुष्यासाठी ठरू शकते घातक? ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांना होता गंभीर आजार, काय आहेत लक्षणं?
3

Satish Shah : झोपेची कमतरता आयुष्यासाठी ठरू शकते घातक? ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांना होता गंभीर आजार, काय आहेत लक्षणं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.