Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Good Health: रोज १०,००० पावले का चालावीत? वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत संपूर्ण माहिती

आजच्या बैठ्या जीवनशैलीत दररोज १०,००० पावले चालल्याने वजन वेगाने नियंत्रणात राहते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मोठी मदत होते. नियमित चालण्याने मानसिक ताण कमी होऊन स्नायू व हाडे अधिक मजबूत होतात, ज्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 06, 2026 | 10:08 PM
Good Health: रोज १०,००० पावले का चालावीत? वजन कमी करण्यापासून ते हृदय निरोगी ठेवण्यापर्यंत संपूर्ण माहिती
Follow Us
Follow Us:
  • दररोज १० हजार पावले चालल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होऊन वाढलेले वजन सहज नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • नियमित चालण्याने रक्ताभिसरण सुधारून उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित विविध गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो.
  • दैनंदिन चालण्याच्या व्यायामामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित राहून मधुमेह आणि मानसिक ताण प्रभावीपणे कमी होण्यास मदत मिळते.

इंटरनेटवर किंवा सोशल मिडियावर तुम्ही १०,००० स्टेप्स चालण्याचा ट्रेंड तर तुम्ही नक्कीच ऐकला असेल. तसेच आजच्या धकाधुकीच्या आणि बैठ्या जीवनशैलीत स्वतःला फिट ठेवणे हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. अशा वेळी ‘रोज १०,००० पावले चालणे’ हा आरोग्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय मानला जातो. रोज सुमारे ७ ते ८ किलोमीटर चालल्याने आपल्या शरीराला अनेक अद्भूत फायदे होतात.

१. वजन नियंत्रणात राहते

नियमित १०,००० पावले चालल्याने शरीरातील सुमारे ३०० ते ४०० कॅलरीज बर्न होतात. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहते.

२. हृदय निरोगी राहते

चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून हृदयाशी संबंधित आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात टळतो.

Health: ट्रेडमिल की इलेप्टिकल? Weight Loss करण्यासाठीं कोणता कार्डीओ ठरेल सर्वात बेस्ट? जाणून घ्या

३. साखरेची पातळी नियंत्रणात राहते

डायबिटीज किंवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणे हे वरदान आहे. रोज चालण्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलतेत सुधारणा होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहण्यास मदत होते.

४. हाडे आणि स्नायू मजबूत होतात

रोज चालल्याने पाय, कंबर आणि सांध्यांचे स्नायू मजबूत होतात. तसेच हाडांची घनता वाढल्याने भविष्यात ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखीसारख्या समस्या उद्भवत नाहीत.

५. मानसिक ताण कमी होतो

चालताना शरीरात ‘एंड्रॉर्फिन’ नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात. यामुळे दिवसभराचा ताणतणाव, चिडचिड आणि नैराश्य दूर होऊन मन प्रसन्न राहते. तसेच रात्री शांत आणि गाढ झोप येते.

आपण आपल्या आयुष्यात सरासरी किती किलोमीटर चालतो? जाणून घ्या हे रंजक तथ्य!

६. पचनक्रिया सुधारते

जेवणानंतर किंवा दिवसभरात नियमित चालल्याने पचनसंस्था व्यवस्थित काम करते. यामुळे बद्धकोष्टता आणि गॅसचा त्रास होत नाही.

चालण्याची सुरुवात कशी करावी?

जर तुम्ही बिगीनर असाल, तर पहिल्याच दिवशी १०,००० पावले चालण्याचा अट्टहास धरू नका. सुरुवातीला ३,००० ते ५,००० पावलांपासून सुरुवात करा आणि हळूहळू ही संख्या वाढवत न्या. ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करणे, जवळच्या कामांसाठी गाडीऐवजी चालत जाणे यांसारख्या छोट्या सवयींमधून तुम्ही तुमचे १०,००० पावलांचे ध्येय सहज गाठू शकता.

निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी जिमचा पर्याय म्हणून दररोज १०,००० पावले चालणे हा एक उत्तम आणि मोफत पर्याय आहे. आजपासूनच रोज चालण्याची सवय लावा आणि तंदुरुस्त राहा.

Web Title: Health benefits of walking 10000 steps daily

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • gymnastics
  • health
  • LIFESTYLE
  • walking benefits

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!
1

स्मार्ट मीटरमुळे लाईटबील जास्त येते का? जाणून घ्या स्मार्ट मीटर आणि पारंपारिक मीटर मधील फरक!

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश
3

Cheap Shawls in Delhi: ‘या’ मार्केटमध्ये ₹100 ते ₹300 मध्ये मिळतील ट्रेंडी शॉल! पार्टी असो वा ऑफिस, लूक दिसेल एकदम स्टायलिश

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
4

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.