Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी करावे कॉफीचे सेवन? जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आणि नियम

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही महागडा डाएट करण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि रक्तात वाढलेली साखरेचे प्रमाण वाढत नाही. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 12, 2026 | 05:30 AM
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी करावे कॉफीचे सेवन? जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आणि नियम

वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या वेळी करावे कॉफीचे सेवन? जाणून घ्या ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे आणि नियम

Follow Us
Follow Us:

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे?
कॉफी कोणत्या वेळी प्यावी?
वजन कमी करण्यासाठी कॉफी फायदेशीर ठरते का?

जगभरातील सर्वच देशांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि हृदयाच्या गंभीर आजाराने असंख्य लोक त्रस्त आहेत. शरीराला कोणत्याही आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात निदान न केल्यास आजार गंभीर होऊन जीवावर बेतू शकतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष देणे फार आवश्यक आहे. वजन वाढल्यानंतर लोक महागडा डाएट, सप्लिमेंट्स, तासनतास जिम तर काहीवेळा वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण चुकीच्या गोळ्यांचा परिणाम किडनीच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वजन कमी करताना योग्य डाएट फॉलो करणे फार आवश्यक आहे, अन्यथा वजन वाढून शरीरावर अनावश्यक चरबीचा थर साचून राहू शकतो.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात सतत कानाचे दडे का बसतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि सोपे घरगुती उपाय, कानाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट

वाढलेले वजन आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन केले जाते. ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे वजन कमी होते, कारण यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. कॅफिन मेटाबॉलिजम वाढवून शरीरातील चरबी ऊर्जा म्हणून वापरण्यास मदत करते. तसेच वाढती भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी कॉफीचे सेवन करावे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आवश्यक प्रमाणात आढळून येतात, ज्याच्या परिणामामुळे वजन नियंत्रणात राहते. कॉफीमधील कॅफिन रक्तातील ‘ऍड्रेनालाईन’ हार्मोन वाढून शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे दूध किंवा साखरेचा वापर न करता बनवलेली कॉफी प्यावी. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रणात राहते.

कॉफीमधील कॅफिन चयापचय क्रिया ३ ते ११ टक्क्यांनी वाढवते, ज्याच्यामुळे अनावश्यक चरबी जळून जाते. कॉफीमुळे ‘पेप्टाईड YY’ नावाचे हार्मोन वाढते ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. पण वारंवार कॉफीचे सेवन करू नये. कॉफी व्यायाम करण्याच्या ३० मिनिटं आधी किंवा सकाळचा नाश्ता झाल्यानंतरच प्यावी. याशिवाय कॉफी कायमच ९:३० ते ११:३० च्या दरम्यान प्यावी. दुपारी ३ नंतर कॉफीचे अजिबात सेवन करू नये. यामुळे रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊन शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते.

Kitchen Tips : स्वयंपाकघरातील या नेहमीच्या चुका पाैष्टीक अन्नालाही बनवतात अनहेल्दी, वेळीच सवयी बदला

नियमित कॉफी पिणाऱ्या व्यक्तींमध्ये टाईप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. कारण कॉफीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतात. रक्तातील साखर कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफी प्यावी. कधीही साखर किंवा दुधाचा वापर करून बनवलेली कॉफी पिऊ नये. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. पण गॅस, ॲसिडिटी किंवा पोटाचे अल्सर इत्यादी त्रासांनी त्रस्त असलेल्या लोकांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये. यामुळे ऍसिडिटीचा त्रास आणखीनच वाढू शकतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती?

    Ans: सकाळी नाश्त्यानंतर किंवा व्यायामाच्या 30 ते 45 मिनिटे आधी ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर मानले जाते.

  • Que: रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे योग्य आहे का?

    Ans: प्रत्येकासाठी नाही. रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास काही लोकांना अॅसिडिटी, जळजळ किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

  • Que: ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यास कशी मदत करते?

    Ans: त्यातील कॅफिन मेटाबॉलिझमला चालना देण्यास, ऊर्जा वाढवण्यास आणि व्यायामादरम्यान कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते. मात्र, केवळ कॉफीमुळे वजन कमी होत नाही; संतुलित आहार आणि नियमित व्यायामही आवश्यक आहे.

Web Title: When should you drink coffee to keep your weight in check learn about the benefits and guidelines for drinking black coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • coffee addiction
  • diabetes
  • Weight loss

संबंधित बातम्या

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
1

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
3

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.