Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतंच कशाला? आता घरीच बनवा लहान मुलांच्या आवडीची ‘स्निकर्स चॉकलेट’, रेसिपी आहे फार सोपी

Snickers Chocolate Recipe : कॅरमल, शेंगदाणे आणि चाॅकलेट वापरुन तयार केलेली स्निकर्स चाॅकलेट लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खायला फार आवडते. याची रेसिपी फार सोपी असून तुम्ही तिला घरीच ट्राय करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 22, 2026 | 09:31 AM
विकतंच कशाला? आता घरीच बनवा लहान मुलांच्या आवडीची 'स्निकर्स चॉकलेट', रेसिपी आहे फार सोपी

विकतंच कशाला? आता घरीच बनवा लहान मुलांच्या आवडीची 'स्निकर्स चॉकलेट', रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • चाॅकलेट खायला फार आवडते?
  • मग स्निकर्स या लोकप्रिय चाॅकलेटविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल.
  • शेंगदाणे, कॅरमल आणि चाॅकलेटच्या थराने नटलेली ही चाॅकलेट चवीला अप्रतिम लागते.
लहान मुलांना गोड पदार्थांची विशेष आवड असते आणि बाजारात मिळणारे स्निकर्स सारखे चॉकलेट बार त्यांना खूप आकर्षित करतात. मात्र या रेडीमेड स्नॅक्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, तसेच त्यामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि कृत्रिम घटकांचा वापर केला जातो. हे घटक नियमितपणे सेवन केल्यास मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक पालक आता मुलांसाठी हेल्दी आणि घरगुती पर्याय शोधत आहेत.

Recipe : गॅस, ॲसिडिटी, अपचनाचा होतोय त्रास? पोटाच्या समस्यांपासून मिळेल अराम; घरी बनवा चटकदार ‘आवळा पुदिन्याची चटणी’

घरी बनवलेले स्निकर्स हे केवळ चविष्टच नसतात, तर त्यामध्ये नैसर्गिक घटकांचा वापर असल्यामुळे ते अधिक पौष्टिकही असतात. खजूर, ओट्स आणि शेंगदाणे यांसारख्या पदार्थांमुळे शरीराला ऊर्जा मिळते, तर डार्क चॉकलेटमुळे गोडपणासोबतच एक वेगळा स्वाद मिळतो. ही रेसिपी बनवायला सोपी असून कोणत्याही कृत्रिम साखरेशिवाय तयार होते, त्यामुळे मुलांसाठी हा एक उत्तम आणि सुरक्षित स्नॅक ठरतो. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी हेल्दी स्निकर्स बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य

  • 1 कप खजूर
  • 1 ते 2 चमचे पीनट बटर
  • चिमूटभर मीठ
  • 1 चमचा व्हॅनिला इसेन्स
  • 1 कप ओट्स
  • अर्धा कप भाजलेले शेंगदाणे
  • 150 ग्रॅम डार्क चॉकलेट
जेवणाची वाढेल रंगत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

कृती

  • सर्वप्रथम खजूर मऊ करण्यासाठी ते उकळत्या पाण्यात सुमारे 30 मिनिटे भिजत ठेवा. नंतर हे खजूर मिक्सरमध्ये टाका आणि त्यात पीनट बटर, व्हॅनिला इसेन्स आणि चिमूटभर मीठ घालून एकसारखा गुळगुळीत पेस्ट तयार करा. हा मिश्रण म्हणजेच नैसर्गिक कॅरमल तयार होईल.
  • यानंतर या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात ओट्स घालून ते हलकेसे मिक्सरमध्ये फिरवून घ्या, जेणेकरून बारची बेस लेयर तयार होईल.
  • आता एक बेकिंग टिन घ्या आणि त्यात बटर पेपर लावा. तयार केलेले ओट्स आणि खजूराचे मिश्रण टिनमध्ये समान पसरवा आणि हाताने हलके दाबून सेट करा. त्यावर उरलेला खजूराचा कॅरमल थर लावा आणि त्यावर भाजलेले शेंगदाणे पसरवा.
  • हे मिश्रण सुमारे 3 तास फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल. सेट झाल्यानंतर त्याचे हवे तसे बारच्या आकारात तुकडे करा.
  • दरम्यान डार्क चॉकलेट वितळवून घ्या आणि तयार केलेले बार त्यात डुबवून पूर्ण कोटिंग करा. पुन्हा एकदा हे बार सुमारे 1 तास फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून चॉकलेट व्यवस्थित घट्ट होईल.
  • तयार झालेले घरगुती हेल्दी स्निकर्स मुलांना सर्व्ह करा. हे स्नॅक्स चविष्ट, पौष्टिक आणि पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे मुलांसाठी एक उत्तम पर्याय ठरतील.

Web Title: Dont buy just make market style snickers chocolate right at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Chocolate
  • easy food recipes
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.