चुकूनही पिऊ नका 'या' फळांचे रस! शरीराला फायदे होण्याऐवजी होईल गंभीर नुकसान
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळांचा रस प्यायला खूप जास्त आवडतो. याशिवाय आहारात फळांचे सेवन करणे अतिशय फायदेशीर मानले जाते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासोबतच वेगवेगळ्या फळांचा रस प्यायला जातो. ताज्या फळांचा रस प्यायल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, पण चुकूनही पॅकबंद फळांचा रस पिऊ नये. हा रस तयार करताना अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला फायदे होण्याऐवजी नुकसान होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
Baba Ramdev ने डायबिटीसवर दिला ‘देशी’ उपाय, आयुर्वेदिक औषधाने शुगर राहील नियंत्रणात
विटामिन सी युक्त संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीर आणि त्वचेला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या रसाचे सेवन करण्याऐवजी ताजी संत्री सोलून खावीत. संत्र्याचा रस बनवल्यानंतर त्यातील फायबर अतिशय कमी होऊन जाते आणि त्यात साखर तशीच राहते. संत्र्याच्या रसात असलेले साखरेमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. ज्यामुळे शरीरात मधुमेह वाढतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी संत्र्याच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. संत्र्याचा रस पिण्याऐवजी संत्र नुसतेच खावे.
शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबामध्ये असलेले लोह आणि इतर घटक शरीरासाठी प्रभावी ठरतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी डाळिंब गुणकारी आहे. पण डाळिंबाचा रस तयार करताना त्यातील फायबरची पातळी अतिशय कमी होऊन जाते. रसामध्ये फक्त पाणी आणि साखर राहते, ज्यामुळे रक्तातील शुगर वाढण्याची जास्त शक्यता असते.
डॉक्टरांच्या मते, बीटचा रस न पिण्याचा सल्ला देतात. बीटमध्ये आयर्न आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बीटचा रस बनवताना त्यातील पोषक घटक नाहीशे होतात. ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीवर गंभीर परिणाम दिसून येतात. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्ही बीटची भाजी, बीट सॅलड किंवा बीटचे इतर पदार्थ बनवून खाऊ शकता. हे पदार्थ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात.
पॅकेज्ड फळांचे ज्यूस आरोग्यासाठी धोकादायक का आहेत?
पॅकेज्ड फळांच्या ज्यूसमध्ये फळांच्या तुलनेत जास्त साखर असते, ज्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. तसेच, या ज्यूसमध्ये फळांमधील फायबर (तंतुमय पदार्थ) आणि इतर पोषक तत्वे कमी असतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा मिळत नाही.
फळे ज्यूस स्वरूपात पिणे फायदेशीर आहे का?
नाही, फळे ज्यूस स्वरूपात पिणे फायदेशीर नाही. ज्यूस काढताना फळांमधील फायबर आणि लगदा (पल्प) वेगळा होतो, त्यामुळे ज्यूसमध्ये फायबर कमी होते आणि त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटत नाही.
ज्यूस ऐवजी फळे खाणे अधिक चांगले का आहे?
फळे खाल्ल्याने तुम्हाला फायबर आणि पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे पोट भरते आणि कमी खाल्ल्याने समाधान वाटते. याउलट, ज्यूस प्यायल्याने जास्त साखर पोटात जाते आणि शरीराला पोषक तत्वे कमी मिळतात.