२२ वर्षीय मुलीचा अॅलर्जीमुळे मृत्यू! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे हल्ली कोणत्याही वयात हार्ट अटॅक, कॅन्सर किंवा शरीरसंबंधित गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य जीवनशैली फॉलो करणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पदार्थाची किंवा वस्तूची कायमच अॅलर्जी असते. पण अॅलर्जीमुळे कोणाचा मृत्यू झाला, हे तुम्ही पहिल्यांदाच ऐकले असेल. अशीच एक घटना ब्राझीलमधील रिओ दो सुल येथे घडली आहे. एका २२ वर्षीय मुलीचा अॅलर्जीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीला वारंवार सर्दी खोकला होत असे, याशिवाय नाकातून पाणी देखील यायचे. तिला शेंगदाणे, परागकण, मधमाशीच्या चाव्या, शंख इत्यादी अनेक पदार्थांची अॅलर्जी होती. पण तिने कायमच शरीरात होणाऱ्या अॅलर्जीकडे दुर्लक्ष केले. पण त्यानंतर अचानक एक दिवस तिला तीव्र अॅलर्जी झाली. लेटिसिया पॉल असे २२ वर्षीय तरुणीचे नाव आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात झालेल्या तीव्र अॅलर्जीचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅन करण्यात आले. सिटी स्कॅनमधील रिपोर्टपाहून डॉक्टरसुद्धा भारावून गेले. तिला अॅनाफिलेक्टिक शॉक या गंभीर अॅलर्जीचे निदान झाले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण २४ तासांच्या आतमध्ये तिचा मृत्यू झाला. चला तर जाणून घेऊया अॅनाफिलेक्टिक शॉक म्हणजे काय? अॅनाफिलेक्टिक शॉकची लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अॅनाफिलेक्टिक शॉक किंवा अॅनाफिलेक्सिस हा गंभीर अॅलर्जीसंबंधित आजार आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पण अनेक लोक या लक्षणांकडे सतत दुर्लक्ष करतात. ही अॅलर्जी सामान्य अॅलर्जीपेक्षा अतिशय तीव्र आणि गंभीर असते. अॅलर्जीची लागण झाल्यानंतर शिंका येणे, नाक बंद होणे किंवा अंगावर खाज येणे इत्यादी अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या अॅलर्जीची लागण झाल्यानंतर रक्तवाहिन्या विस्तारतात आणि श्वसन नळ्या आकुंचन पावतात. ज्यामुळे घसा बंद होणे, श्वास घेण्यास त्रास होत आहे, शिट्टीचा आवाज येणे किंवा अचानक चक्कर येणे इत्यादी समस्या उद्भवतात. अॅलर्जी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीरावर पसरू लागते. शरीराचा रक्तदाब अतिशय कमी होऊन जातो, हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा त्वचेवर लाल रंगाची पुरळ येते.
अॅनाफिलेक्टिक शॉक या गंभीर अॅलर्जीची लागण झाल्यानंतर एपिनेफ्रिन (अॅड्रेनलिन) चे इंजेक्शन दिले जाते. शरीराची स्थिती अचानक बिघडल्यानंतर एपिनेफ्रिन (अॅड्रेनलिन) चे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नेहमीच रुग्णाच्या सोबत एपिनेफ्रिन ऑटो-इंजेक्टर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काहींना या आजाराची लक्षणे उशिरा समजतात, ज्यामुळे त्यांना वारंवार घसा खवखवणे किंवा घट्टपणा, छातीत जडपणा जाणवणे, घाबरणे, उलट्या किंवा मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.
पॉलला वैद्यकीय चाचण्यांमध्ये वापरण्यात आलेल्या कॉन्ट्रास्ट एजंटची अॅलर्जी झाली होती. हा एक द्रव पदार्थ असून सीटी स्कॅन करताना शरीरात प्रवेश करतो. यामुळे शरीराच्या आतील अवयवांना सुद्धा इजा पोहचते. शरीराच्या कोणत्याही भागात कोणताही ट्यूमर किंवा गाठ होणे किंवा रक्तस्त्राव होते. कॉन्ट्रास्ट एजंट सहसा आयोडीन-आधारित असतात. ते रक्तवाहिनीत इंजेक्शनद्वारे दिले जातात, कधीकधी तोंडी किंवा एनीमा म्हणून, चाचणीच्या प्रकारावर अवलंबून राहून बहुतेक लोक ते सहजपणे सहन करतात. सौम्य परिणामांमध्ये शरीरात उष्णता जाणवणे, तोंडात धातूची चव किंवा सौम्य मळमळ यांचा समावेश होतो.