Immunity सुधारण्यासाठी संध्याकाळच्या वेळी प्या गरमागरम पहाडी मसाला चहा!
भारतासह जगभरात असंख्य चहाप्रेमी आहेत. सकाळी उठल्यानंतर काहींच्या दिवसाची सुरुवात चहाने होते तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. वाफाळत्या गरमागरम चहा एक घोट घेतल्यानंतर शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा पूर्णपणे कमी होऊन जातो. शरीरात ऊर्जा निर्माण होते. सतत चहा पावडर आणि साखर घालून बनवलेल्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साखर वाढण्याची शक्यता असते. वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते, ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसेच सतत पावसात भिजल्यामुळे डोकेदुखी, सर्दी, खोकला इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही गरमागरम पहाडी मसाला चहा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मसाला चहा बनवताना त्यात पुदिना, तुळस, दालचिनी, आल्याचे तुकडे इत्यादी औषधी वनस्पतीचा वापर करू शकता. चला तर जाणून घेऊया पहाडी मसाला चहा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी