जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं
जेवणाच्या ताटात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि आंबट तिखट पदार्थ खाण्यास हवा असतो.अशावेळी आंब्याचं लोणचं, मिरचीची लोणचं किंवा गोड लोणचं खाल्लं जाते. यासोबतच बाजारात आवळ्याचे सुद्धा लोणचं मिळते. आवळा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार, आवळा खाल्ल्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. यामध्ये जीवनसत्त्व सी, लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन केले जाते. याशिवाय अनेक लोक कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून सेवन करतात, ज्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर डिटॉक्स होते. आवळ्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणात आवळ्याचे लोणचं खाल्ल्यास शरीराची भूक वाढते आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचं लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य: Pinterest)
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट चणाडाळ कोबी