केस गळून टक्कल पडलं आहे? केसांच्या घनदाट वाढीसाठी नियमित प्या 'हे' आयुर्वेदिक ड्रिंक
वातावरणात सतत होणारे बदल, आहारातील बदल, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांसह आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र वारंवार केस गळतीची समस्या उद्भवू लागल्यास अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर ती थांबवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनरचा वापर केल्यामुळे केस आणखीनच गळू लागतात. सतत केस गळत राहिल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण होतो.(फोटो सौजन्य – iStock)
Vitamin च्या कमतरतेमुळे होतोय AMH पातळीवर परिणाम, जाणून घ्या तज्ज्ञांकडून
बाहेरील प्रदूषित हवा, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया, केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करणे, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टी केसांच्या अपुऱ्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. केस पातळ झाल्यानंतर केसांमध्ये फणी मारणे सुद्धा कठीण वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आयुर्वेदिक ड्रिंक तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. याशिवाय या रसाचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, हे देखील सांगणार आहोत.
केसांच्या वाढीसाठी आवळा अतिशय प्रभावी आहे. आवळ्यामध्ये असलेले विटामिन सी केसांना पोषण देते. त्यामुळे रोजच्या आहारात आवळ्याचा रस किंवा आवळ्याच्या चटणीचे आहारात सेवन करावे. केसांमध्ये वाढलेला कोंडा आणि केस गळतीच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आवळ्याचे आहारात नियमित सेवन करावे. आयुर्वेदिक ड्रिंक तयार करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीटचे तुकडे, आवळा आणि आल्याचा तुकडा टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात एक ग्लास पाणी आणि काळीमिरी पावडर घालून पुन्हा एकदा वाटून घ्या. तयार केलेला रस गाळून नियमित सेवन करावे.
आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी अतिशय महत्वाचे आहे. याशिवाय बीटचा रस नियमित प्यायल्यास शरीर डिटॉक्स होऊन त्वचा सुधारण्यास मदत होईल. त्वचा आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी रोजच्या आहारात बीट आणि आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करावे. बीटचा रस प्यायल्यामुळे केस गळती कमी होते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म केसांच्या वाढीसाठी प्रभावी ठरतात.