विटामिनची कमतरता असेल तर काय होते (फोटो सौजन्य - iStocK)
एएमएच म्हणजे अँटी-म्युलेरियन संप्रेरक (AMH), आपल्याला हे ऐकून नवल वाटेल की, व्हिटॅमिनची कमतरता हे अँटी-मुलेरियन हार्मोन (AMH) चा पातळीवर नकारात्मक परिणाम करू शकते. एएमएच हा एक असा संप्रेरक आहे जो स्त्रीच्या अंडाशयातील हा हॉर्मोन स्त्रीबीजांची संख्या क्षमता दर्शवतो. एएमएच चाचणी ही प्रजनन क्षमता तपासण्याचा आणि गर्भधारणेची योजना आखण्यासाठी योग्य ठरते. महिलेच्या गर्भाशयातील गुणवत्तापूर्ण बीजांडाच्या पेशींची संख्या दर्शविण्यासाठीदेखील याचा उपयोग केला जाऊ शकतो अथवा गरोदरपणात महिलेची स्त्रीबीज तयार करण्याची क्षमता यावरून समजू शकते.
आरोग्याकडे लक्ष द्या
महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषतः जेव्हा प्रजनन समस्यांना तोंड द्यावे लागते अशावेळी योग्य. व्हिटॅमिन डी, बी१२ आणि फॉलिक अॅसिड सारख्या जीवनसत्त्वांमधील कमतरता हार्मोनल संतुलन, स्त्रीबीजांची गुणवत्ता आणि एकूण प्रजनन आरोग्यावर परिणाम करतात असे आढळून आले आहे. या कमतरतेचे वेळीच निदान करून, महिलांना निरोगी एएमएच पातळी राखता येते.
8 फळं जे शरीराला कधीच पडू देणार नाही विटामिन बी-6 ची कमतरता, आजच सुरू करा खाणे
विटामिनची कमतरता
२५ ते ३० वयोगटातील महिलांमध्ये व्हिटॅमिनची कमतरता सामान्य आहे, विशेषतः ज्या महिलांना आहाराच्या चूकीच्या सवयी तसेच ज्यांच्या दैनंदिन जीवनात तणावाचे प्रमाण अधिक असते. हे पचन समस्या किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आणि थायरॉईड विकारासारख्या परिस्थितींमुळेदेखील उद्भवू शकते. लक्षणांमध्ये थकवा येणे, केस पातळ होणे, त्वचा फिकी पडणे, प्रतिकारशक्ती कमी होणे आणि मासिक पाळीमध्ये अनियमितता दिसून येते. जर यावर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हार्मोनल असंतुलन, प्रजनन क्षमतेत बिघाड आणि गर्भधारणेदरम्यान किंवा प्रजनन उपचारांदरम्यान विपरीत परिणाम होतात.
काय करावे?
म्हणूनच, नियमित रक्त तपासण्या, संतुलित आणि पोषक आहाराचे सेवन करणे गरजेचे आहेत. जेव्हा व्हिटॅमिन डी किंवा बी१२ सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता असते, तेव्हा ते शरीराच्या एएमएचची पातळी तयार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते, जे महिलेची प्रजनन क्षमता समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. गर्भधारणेचे नियोजन करणाऱ्या किंवा प्रजनन मूल्यांकन करणाऱ्या महिलांनी त्यांच्यात व्हिटॅमिनची कमतरता नसल्याचे सुनिश्चित केले पाहिजे, अशी माहिती डॉ. बुशरा खान(वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, खराडी, पुणे ) यांनी दिली.
तज्ज्ञांचे मत
डॉ. प्रीतिका शेट्टी( प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ मदरहुड हॉस्पिटल्ल, खराडी) सांगतात की, प्रजनन क्षमता चांगली रहावी याकरिता महिलांनी हिरव्या पालेभाज्या, हंगामी फळं, काजू आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करावा. व्हिटॅमिन डीची योग्य पातळी राखण्यासाठी सकाळी किमान २० मिनिटे नियमित सूर्यप्रकाश घ्यावा, योगा आणि ध्यान करून व्यायाम करावा आणि तणावाची पातळी कमी करावी, तुमची प्रजनन क्षमता जाणून घेण्यासाठी संबंधीत रक्त आणि हार्मोन तपासण्या कराव्यात.
काय खावे आणि काय टाळावे याबद्दल तज्ज्ञांची मदत घ्या. मित्रांनो, जर तुम्ही गर्भधारणेची योजना आखत असाल तर फर्टिलिटी कन्सल्टंटच्या संपर्कात राहिल्याने व्हिटामिनची कमतरता दूर होण्यास आणि यशस्वीरित्या गर्भधारणा होण्यास मदत होईल.