वयाच्या ७० व्या वर्षीसुद्धा अभिनेत्री रेखाचे केस आहेत काळेभोर घनदाट!
सर्वच महिलांना अभिनेत्रींप्रमाणे चमकदार आणि सुंदर केस हवे असतात. बऱ्याचदा वातावरणात होणारे बदल, शरीरात होणारे हार्मोनल बदल, आहारातील बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम ज्याप्रमाणे आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक गळणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेले हेअर मास्क, वेगवेगळे शॅम्पू किंवा इतर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे केसांसाठी कोणतेही चुकीचे आणि केसांना सूट न होणारे शँम्पू वापरू नये.(फोटो सौजन्य – pinterest)
बॉलिवूडमधील अतिशय सुंदर आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयामुळे सगळीकडे फेमस आहे. तिचा अभिनय, सौंदर्यामुळे ती कायमच सगळीकडे चर्चेत असते. ती वयाच्या सत्तरीमध्ये सुद्धा कायम तरुण आणि सुंदर दिसते. तिचे लांबलचक काळेभोर केस अजूनही सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रेखाच्या हेल्दी आणि काळ्याभोर केसांचे सीक्रेट सांगणार आहोत. रेखा तिच्या काळ्याभोर केसांसाठी नेमका कोणता हेअर मास्क लावते, चला तर जाणून घेऊया सविस्तर.
रेखाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हंटले आहे की, ती सुंदर आणि चमकदार केसांसाठी कोणतेही हेअर केअर प्रॉडक्ट वापरत नाही. केसांची काळजी घेण्यासाठी ती घरगुती पदार्थांचा वापर करते. अंडी, दही आणि मधापासून तयार केलेल्या हेअर मास्कचा वापर ती नेहमीच करत असते. हा हेअर केसांना मुळांपर्यंत पोषण देण्याचे काम करतो. या हेअर मास्कमुळे केस मजबूत आणि सुंदर होण्यास मदत होते.
हेअर मास्क तयार करण्यासाठी वाटीमध्ये अंड घेऊन व्यवस्थित फेटून घ्या. त्यानंतर त्यात दही आणि मध टाकून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेली पेस्ट ५ मिनिटं तशीच ठेवून घ्या. त्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर मास्क लावा. यामुळे केसांना भरपूर पोषण मिळेल आणि केस मजबूत होतील. त्यानंतर २० मिनिटांनी केस शँम्पूने स्वच्छ करून घ्या.
केसांच्या निरोगी वाढीसाठी हेअर मास्क अतिशय महत्वाचा आहे. यामुळे केस मजबूत आणि मऊ होतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हेअर मास्क केसांना लावावा. हेअर मास्क मध्ये असलेल्या अंड्यामुळे केस मजबूत आणि मऊ होतात. याशिवाय केसांना योग्य प्रथिने मिळतात. मध केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात.