
उपाशी पोटी गरम पाण्यात मिक्स करून प्या 'हा' पदार्थ, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
आतडे स्वच्छ करण्यासाठी उपाय?
एरंडेल तेलाचे शरीराला होणारे फायदे?
ऍसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
चुकीची जीवनशैली आणि दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामांमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागतात. सतत जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शारीरिक समस्या उद्भवू लागतात. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात, ज्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सुद्धा होण्याची शक्यता असते. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे पोटात वेदना होणे, पोटात जडपणा जाणवणे, उलट्या, मळमळ, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी लक्षणे दिसू लागतात. (फोटो सौजन्य – istock)
महिन्यातून 5 दिवसात सहज होऊ शकता Pregnant, 24 तासात संपुष्टात येते 20% क्षमता; तज्ज्ञांचा खुलासा
थंडीच्या दिवसांमध्ये पोट स्वच्छ न होण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. वाढत्या अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयाच्या सेवनामुळे शरीर आणि आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी एरंडेल तेलाचे सेवन करावे. यासाठी एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा किंवा एक चमचा एरंडेल तेल मिक्स करून प्यावे. या पेयांचे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सेवन केल्यास आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. आयुर्वेदानुसार, एरंडेल तेल संपूर्ण शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. पण या तेलाचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. चुकीच्या वापरामुळे शरीराला हानी पोहचू शकते. एरंडेल तेलाचे सेवन केल्यामुळे आतड्या स्वच्छ होतात. गॅस, एसिडीटी, अचपनाच्या वाढू लागल्यास आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. शरीरात जमा झालेली विषारी घाण संपूर्ण शरीराचे नुकसान करते.
एरंडेल तेलाचे नियमित अर्धा चमचा सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल. याशिवाय त्वचेवर चमक येऊन तुम्ही कायमच फ्रेश दिसाल. त्वचेची खराब झालेली पोत सुधारण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि मुरूम कमी होऊन त्वचा उजळदार होते. पोटात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे भूक न लागणे किंवा खाण्यापिण्याची इच्छा पूर्णपणे कमी होऊन जाते.
एरंडेल तेलाच्या सेवनामुळे आतडे स्वच्छ राहतात. याशिवाय एरंडेल तेलाचे सेवन तुम्ही कोमट पाण्यात किंवा दुधासोबत करू शकते. एरंडेल तेलाचे सेवन केल्यामुळे ५ तासांमध्ये पोट व्यवस्थित स्वच्छ होते. एरंडेल तेलाचे सेवन आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच करावे. जास्त प्रमाणात एरंडेल तेलाचे सेवन केल्यास जुलाब किंवा शरीरसंबंधित समस्या उद्भवू शकतात.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी आतड्याची हालचाल होणे.
Ans: आहारात फायबरची कमतरता.
Ans: शौचास कठीण होणे किंवा शौच करताना ताण येणे.