
रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या 'हा' पौष्टीक पदार्थ
रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा तूप मिक्स करून प्यावे. नियमित तुपाचे सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. तूप शरीरासाठी अतिशय प्रभावी नाही. जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवताना तुपाचा वापर केला जातो. यासोबतच गरम दुधात तुम्ही हळद सुद्धा टाकू शकता. यामुळे शरीराच्या अंतर्गत अवयवांना आलेली सूज कमी होऊन शरीराला अनेक फायदे होतील. महिनाभर नियमित दुधात तूप आणि हळद मिक्स करून प्यायल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि शरीर कायमच हेल्दी राहील.
तूप टाकलेले दूध नियमित प्यायल्यास शरीराची पचनक्रिया कायमच चांगली राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. वारंवार बद्धकोष्ठता, पोटात वाढलेल्या वेदना आणि ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधाचे सेवन केले जाते. यासोबतच तूप खाल्ल्यामुळे निरोगी बॅक्टेरिया वाढून आतड्यांचे कार्य सुलभ राहते. वारंवार गॅस होत असेल तर तूप टाकलेले दूध प्यावे. यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहील.
तुपाच्या सेवनामुळे शरीराचे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. तुपामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराईड्स मेटाबॉलिझ्म वाढून शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेल्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते आणि शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय तुपामध्ये असलेल्या विटामिन ए, डी, ई, के मुळे त्वचेवरील चमक कायम टिकून राहते आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी तूप टाकलेले दूध प्यावे.