केसांची होईल झपाट्याने वाढ! सकाळी उठल्यानंतर करा आवळ्याच्या रसाचे सेवन
आवळा खाल्यामुळे केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळते. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, कर्करोग-विरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. शक्तिशाली फळांच्या यादीमध्ये आवळ्याचे नाव कायमच घेतले जाते. आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडून जाते. आज आम्ही तुम्हाला केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळ्याचा वापर कसा करावा, माहिती सांगणार आहोत. आवळ्याच्या सेवनामुळे केसांची गुणवत्ता सुधारून केसांच्या मुळांना भरपूर पोषण मिळेल आणि केसांची झपाट्याने वाढ होईल.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी आढळून येते. आवळा केस आणि त्वचेसाठी अत्यंत प्रभावी आहे. आवळा स्वच्छ धुवून बारीक तुकडा करा. मिक्सरच्या भांड्यात बारीक चिरून घेतलेला आवळा, काळीमिरी, कढीपत्त्याची पाने, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेला रस गाळून त्यात थोडस पाणी घालून नियमित सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारेल. तसेच तयार केलेले मिश्रण गाळून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. कोमट पाण्यात नियमित एकआईस क्यूब टाकून सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
आवळ्याचा रस नियमित प्यायल्यास हार्मोन्स संतुलित राहतील. आवळ्यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी राहते. बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. याशिवाय रक्तात साचून राहिलेले विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी इतर कोणत्याही पेयांचे सेवन करण्याऐवजी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचेची गुणवत्ता सुधारेल.






