लहान वयात चेहऱ्यावर सुरकुत्या- बारीक रेषा दिसू लागल्यात? मग शहनाज हुसैनने सांगितला 'हा' उपाय नक्की करा
तरुण वयात चेहऱ्यावरील चमक कमी झाल्यानंतर महिलांमध्ये तणाव आणि चिंता वाढते. मानसिक आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच आनंदी राहणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी शहनाज हुसैनने सांगितलेले काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे सुरकुत्या कमी होऊन चेहऱ्यावरील बारीक रेषा दिसत नाहीत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडल्यानंतर मॉईश्चरायजर लावणे आवश्यक आहे.
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मध आणि लिंबाच्या रसाचा वापर करावा. वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात मध मिक्स करा. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचेच्या सर्वच समस्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल. मधात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक उजळदार होते आणि सुंदर दिसते.
थंडीच्या दिवसांमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोरफड जेल चेहऱ्यावर लावावे, कोरफड जेल चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. कोरफड जेल लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. याशिवाय चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यासाठी कोरफड जेल लावावे.
जेवण बनवताना पदार्थांचा रंग आणि चव वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे त्वचेवर आलेले काळे डाग, पिंपल्स कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होते. यासाठी वाटीमध्ये हळद आणि चंदन पावडर एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळा ठेवून नंतर स्वच्छ धुवून टाका. चंदन पावडर लावल्यामुळे चेहऱ्यावरील तेल नियंत्रणात राहते.






