Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करतो ‘या’ फळाचा रस, हृदयाचे आरोग्य राहील चांगले

शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी टोमॅटोचा रस अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय टोमॅटोचा रस प्यायल्याने त्वचेलासुद्धा अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो रस बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 08, 2024 | 05:30 AM
टोमॅटो रस पिण्याचे फायदे

टोमॅटो रस पिण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल साचण्यास सुरुवात होते. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळा रंगाचा चिकट थर जमा होऊ लागतो. ज्यामुळे हृदयाच्या आणि शरीराच्या इतर अवयवांमधील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. हा चिकट थर हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन करू नये. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. त्यातील खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: थंडीच्या दिवसांमध्ये जास्त झोप का येते?

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे, सतत थकवा जाणवणे, सतत चक्कर येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. टोमॅटो शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. शिवाय टोमॅटोचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया टोमॅटो खाण्याचे फायदे? टोमॅटो रस बनवण्याची सोपी पद्धत? हा रस प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात. जाणून घेऊया सविस्तर.

टोमॅटो खाण्याचे प्रभावी फायदे:

टोमॅटो ही फळ भाजी असून जेवणातील पदार्थांमध्ये वापरली जाते. टोमॅटोचा जेवणात वापर केल्यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंधसुद्धा वाढतो. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्वे, खजिने आणि अँटीऑक्सीडंट्स इत्यादी घटक आढळून येतात. जे शरीरासाठी आवश्यक आहे. टोमॅटो खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. टोमॅटोचे सेवन केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले विटामिन्स त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहेत.

टोमॅटो रस पिण्याचे फायदे

टोमॅटोचा रस बनवण्याची कृती:

साहित्य:

टोमॅटो, पाणी, पुदिना, काळे मीठ

कृती:

  • टोमॅटोचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे चार तुकडे काढून बिया काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, काळ मीठ, पुदिन्याची पाने आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरमधून वाटून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला टोमॅटो रस.
हे देखील वाचा: दुधामध्ये गूळ टाकून प्यायल्यास आरोग्याला होतील फायदे, शारीरिक समस्या होतील दूर

टोमॅटो रस पिण्याचे फायदे:

टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन नावाचे अँटीऑक्सिडंट शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. तसेच यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते. या फळामध्ये कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्ही टोमॅटोच्या रसाचे सेवन करू शकता. टोमॅटोमध्ये फायबर जास्त असते. यामुळे त्वचेलासुद्धा फायदा होतो. टोमॅटोचा रस प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. शरीरातील कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी टोमॅटोचा रस प्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Drink tomato juice regularly to reduce cholesterol benefits of drinking tomato juice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम
1

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे
2

वारंवार लघवीला होते? पाणी न पिताही सतत लघवीला होत असेल तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या लक्षणे

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
3

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या
4

उपाशी पोटी चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.