Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

मूळव्याधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. यामुळे ऑपरेशनशिवाय मूळव्याध आणि जुनाट बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 20, 2026 | 08:01 AM
ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

ऑपरेशनशिवाय कायमचा बरा होईल मूळव्याध! दैनंदिन आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश, वेदनांपासून मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

दैनंदिन आहारात होणारा बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता, जंक फूड, कोणत्याही वेळी जेवण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठतेची समस्या वाढू लागते. वाढत्या बद्धकोष्ठतेकडे वेळीच लक्ष न दिल्यास मूळव्याध होण्याची शक्यता असते. लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर व्यक्तींपर्यंत कोणालाही मूळव्याध होऊ शकतो. फायबरची कमतरता, पाण्याचे कमी सेवन, तासनतास एका जागेवर बसून राहणे या चुकीच्या सवयी शरीरास धोका निर्माण करतात. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वारातील रक्तवाहिन्यांना सूज येते. डॉक्टरांच्या मते, एका जागेवर तासनतास बसून राहिल्यामुळे खालच्या भागातील रक्ताभिसरण मंदावते आणि रक्तवाहिन्या फुगतात.(फोटो सौजन्य – istock)

योग्य पद्धतीने हात धुतल्यास संसर्गाचा धोका ५०% पर्यंत होऊ शकतो कमी! जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

बद्धकोष्ठता झाल्यानंतर शौचास जास्त जोर लावावा लागतो, ज्याच्या परिणामामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येऊन रक्त पडणे किंवा मोड बाहेर येण्याची जास्त शक्यता असते. जीवनशैलीतील चुकीच्या सवयी आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा मूळव्याध झाल्यानंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. पण ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा एकदा मूळव्याध होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऑपरेशन न करता मूळव्याध बरा करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती. आहारात फायबर वाढवणे, भरपूर पाणी पिणे आणि नियमित व्यायाम केल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळू शकते.

मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • शौचाच्या वेळी वेदना होणे
  • रक्त पडणे
  • वारंवार बद्धकोष्ठता
  • मोड बाहेर येणे
  • गुदद्वाराच्या ठिकाणी खाज येणे.

आहारातील ‘या’ चुकांमुळे वाढतो मूळव्याध:

धावपळीच्या जीवनशैलीमुळे हल्ली प्रत्येक व्यक्ती बाहेरील विकतचे आणि पॅक बंद पदार्थ खाण्यास जास्त पसंत करते. आहारात सतत जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. सतत एका जागी बसणे, आहारात फायबरची कमतरता, कमी पाणी पिणे, गरोदरपण, जुनाट बद्धकोष्ठता इत्यादी कारणांमुळे मूळव्याध होतो. मैदा, पांढरा भात आणि प्रक्रिया केलेले पदार्थ किंवा पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते. ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो.

Teeth Care: कृत्रिम दातांची काळजी कशा पद्धतीने घ्यावी? जाणून घ्या स्वच्छता, वापर आणि काळजी घेण्याच्या महत्वपूर्ण टिप्स

मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश:

दैनंदिन आहारात ओट्स, नाचणी, पालेभाज्या, आणि फळे इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांची हालचाल कायमच सुरळीत चालू ठेवण्यासाठी नियमित दही, ताक आणि इतर थंड पदार्थांचे सेवन करावे. तसेच दिवसभरात ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ होण्यासाठी रात्री अंजीर पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी खावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मूळव्याध म्हणजे काय?

    Ans: मूळव्याध म्हणजे गुदद्वाराजवळील शिरा सुजणे. यामुळे वेदना, जळजळ, खाज किंवा रक्तस्राव होऊ शकतो.

  • Que: आहारामुळे मूळव्याधीचा त्रास कमी होऊ शकतो का?

    Ans: होय. फायबरयुक्त आहार घेतल्याने मल मऊ राहतो आणि शौचास त्रास कमी होऊन मूळव्याधीचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते.

  • Que: मूळव्याधीमध्ये कोणते पदार्थ टाळावेत?

    Ans: तिखट, तेलकट, जंक फूड आणि कमी फायबर असलेले पदार्थ टाळणे आवश्यक असते.

Web Title: Hemorrhoids will be cured forever without surgery include these foods in your daily diet you will get relief from pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 08:01 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • Health Care Tips
  • piles

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
3

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी
4

Gut Health: आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल मुळांपासून स्वच्छ! गुळासोबत करा ‘या’ पिवळ्या पदार्थाचे सेवन, पोटावरची चरबी होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.