अंथरुणात पडताच लागेल शांत झोप, फक्त झोपण्यापूर्वी दुधात 'हा' पदार्थ मिसळून प्या; सकाळी उठताच पोटही होईल साफ
अनेकदा कामातून थकून आपण रात्री झोपण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या लवकर झोप लागत नाही अथवा झोप लागली तर अचानक झोपेतून जग येते. हे असे सतत होत असेल तर ते आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगले नाही. निद्रानाशाची ही समस्या वाढली तर तिची सवय होऊ शकते. अशात वेळेत यावर उपाय केले नाही तर आपल्या झोपेचे चक्र बिघडू शकते. मानसिक तणाव, कामाचा ताण, मोबाईलचा अतिवापर आणि बिघडलेली जीवशैली हे याचे कारण असून शकते.
झोपेची ही समस्या सामान्य वाटत असली तरी आपल्या रोजच्या जीवनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. रात्री वेळेत झोप न लागल्याने आपली झोप पूर्ण होत नाही आणि यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो, दिवसभर सुस्ती राहते आणि मग आपला दिवस खराब होतो. अशातच आज आम्ही तुम्हाला एक नैसर्गिक उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या वापराने तुमच्या झोपेच्या समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही फक्त रात्री झोपण्यापूर्वी दुधात जायफळ मिसळून त्याचे सेवन करा. साधा वाटणारा हा उपाय तुमच्या झोपेचे आणि आयुष्याचे चक्र सुधारू शकतो.
जायफळ आणि दूध
जायफळमध्ये myristicin नावाचे संयुग असते जे नैसर्गिकरित्या मेंदू शांत करण्याचे काम करते. जुन्या काळापासून शांत झोपेसाठी जायफळाचा वापर केला जातो. यासाठी कोमट दुधात जायफळ पावडर मिक्स करून त्याचे सेवन केले जाते. असे करताच काही क्षणात आपल्याला शांत झोप लागते ज्यामुळे दुसरा दिवसही चांगला जातो. यामुळे तुमचे मनही शांत होते आणि मेंदूमध्ये सुरु असणारा विचारांचा गोंधळ देखील थांबतो.
दुधात जायफळ मिसळून पिण्याचे फायदे
दूध हे झोपेसाठी फायदेशीर मानले जाते मात्र यात जर जायफळ मिसळले तर त्याचा फायदा आणखीन वाढू शकतो. दुधात जायफळ मिसळून प्यायल्याने शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. स्लीपिंग पिल्स घेऊन झोपण्यापेक्षा हा नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. बऱ्याच जणांना रात्रीच्या जेवणानंतर अपचन, गॅस, किंवा पोट फुगण्याच्या समस्या जाणवतात अशात दूध आणि जायफळचे हे मिश्रण पोटाच्या समस्या दूर करण्यासही मदत करतात. जायफळामध्ये अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे पोटाची जळजळ कमी करण्यास मदत करतात. आरोग्यासाठी फक्त झोपच गरजेची नाही तर शांत, सखोल झोपही महत्त्वाची आहे ज्यात जायफळ तुम्हाला मदत करू शकते. जायफळ दुधाचे सेवन फक्त झोप आणत नाही तर झोपेत व्यत्यय न आणता शरीराला पूर्णपणे विश्रांती देण्याचे काम करते. यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी ताजेतवाने, उत्साही आणि मानसिकदृष्ट्या संतुलित राहता.
शरीरासाठी किती झोप आवश्यक आहे?
8-10 तास
झोप कशी सुधारता येते?
नियमित झोपेचे वेळापत्रक ठेवा, झोपण्यापूर्वी कॅफिन आणि अल्कोहोल मर्यादित करा, ताण आणि चिंता कमी करा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.