(फोटो सौजन्य: istock)
पीरियड्स म्हणजेच मासिक पाळी ही स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला होणारी एक नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस आहे. मात्र, आजही आपल्या समाजात याविषयी खुलेपणाने बोलले जात नाही. या काळात महिलांना विविध शारीरिक व मानसिक बदलांचा सामना करावा लागतो, पण त्याहूनही मोठी अडचण म्हणजे आजही लोकांच्या मनात या प्रक्रियेबाबत अनेक चुकीच्या समजुती रुजलेल्या आहेत.
Kapil Sharma ने 63 दिवसात कमी केले 11 किलो वजन, फिटनेस कोचने सांगितला 21-21-21 फॉर्म्युला
या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ऑर्थोपेडिक आणि हेल्थ एज्युकेटर डॉ. मनन वोरा यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी पीरियड्सविषयी समाजात प्रचलित असलेल्या गैरसमजांवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भाष्य केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या विषयावर जितकी पारदर्शकता आणि माहिती असेल, तितकाच समाज अधिक समजूतदार बनेल. केवळ मुलींनीच नाही, तर मुलांनीही याची माहिती घेतली पाहिजे, कारण समाज म्हणजे दोघांचा मिळून बनलेला आरसा.
पीरियड्समध्ये गर्भधारणा होऊ शकते का?
होय! पीरियड्सच्या काळात गर्भधारणा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. स्पर्म हे स्त्रीच्या शरीरात ५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात, त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये गर्भधारणा शक्य होते. त्यामुळे हा काळ पूर्णपणे सुरक्षित समजणे चुकीचे आहे.
पपई खाल्ल्याने पीरियड्स लवकर येतात का?
अनेकदा मासिक पाळी लवकर येण्यासाठी पपईचे सेवन केले जाते. मात्र हा एक शुद्ध गैरसमज आहे. पपईचे पचन सुधारण्यामध्ये उपयोग होतो, परंतु मासिक पाळी लवकर आणण्याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
कोल्ड ड्रिंक्स पीरियड्स थांबवू शकतात का?
कोल्ड ड्रिंक्स मासिक पाळी थांबवू शकतात असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कोणतेही थंड पेय, फळांचा रस किंवा कोल्ड ड्रिंक पीरियड्सच्या फ्लोवर परिणाम करत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे टाळणे गरजेचे नाही.
पीरियड्स मिस होणे म्हणजे लगेच प्रेग्नंसी?
मासिक पाळी न येणे नेहमी प्रेग्नंसीचा इशारा नसतो. तणाव, थायरॉईड समस्या, पीसीओएस, वजन वाढ/कमी होणे, झोपेचा अभाव या सर्व गोष्टी मासिक पाळी अनियमित होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.
पीरियड्समध्ये लोणचं किंवा आंबट गोष्टी टाळाव्यात?
मासिक पाळीत आंबट गोष्टी खाऊ नयेत हा लोकांचा गैरसमज आहे. हे पूर्णपणे पारंपरिक आणि अंधश्रद्धेवर आधारित मत आहे. आंबट गोष्टी खाल्ल्याने पीरियड्समध्ये कोणताही धोका नाही.
पीरियड्समध्ये अंघोळ किंवा केस धुणं टाळावं का?
अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ राहते, संसर्गाची शक्यता कमी होते आणि महिलांना आरामही मिळतो. बऱ्याचदा मासिक पाळीत केस धुणे चुकीचे मानले जाते मात्र हा लोकांचा फक्त एक समज आहे जो पूर्णपणे चुकीचा आहे.
सॅनिटरी पॅडमुळे कॅन्सर होतो का?
मासिक पाळीत सॅनिटरी पॅड महत्त्वाची भूमिका बजावतं. सॅनिटरी पॅड वापरल्याने कॅन्सर होत नाही. पण ते वेळेवर बदलले नाहीत तर बॅक्टेरियल इंफेक्शन होऊ शकते. त्यामुळे दर ४-५ तासांनी पॅड बदलावा.
प्रत्येक पुरुषाने अंगीकारल्या पाहिजेत ‘या’ सवयी, वय वाढेल पण फिटनेस राहील एकदम जशाचा तसा…
पीरियड्समध्ये व्यायाम टाळावा का?
नाही, व्यायाम केल्याने क्रॅम्प्स कमी होतात, मूड सुधारतो आणि शरीर अधिक हलकं वाटतं. योगा, स्ट्रेचिंग यासारखे हलके व्यायाम फायदेशीर ठरतात. पीरियड्सबाबत समाजात आजही अनेक अर्धवट माहिती आणि अंधश्रद्धा प्रचलित आहेत. त्यामुळे विज्ञानावर आधारित माहिती आणि खुले संवाद हे अत्यंत आवश्यक आहे. मुलींसोबतच मुलांनाही ही माहिती असावी, जेणेकरून महिलांच्या गरजा, भावना आणि आरोग्य याकडे समजून घेण्याचा दृष्टिकोन समाजात विकसित होईल.
कोणत्या वयात मासिक पाळी थांबते?
४५ ते ५५ वयादरम्यान
मासिक पाळी किती दिवस येऊ शकते?
२ ते ७ दिवस
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.