Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारी झोप टाळण्यासाठी पिताय चहा? शरीराला कसे ठरते नुकसानदायी

Tea Side Effects: चहा प्यायला कोणाला आवडत नाही, पण जर तुम्ही हे गरम पेय जास्त प्रमाणात सेवन केले तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवते हे नक्की. विशेषतः दुपारी चहा पिणे चांगले मानले जात नाही. पण सर्वाधिक चहा हा दुपारीच जेवण झाल्यानंतर पिण्यात येतो. झोप घालविण्यासाठी अनेक जण चहा दुपारी पितात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 23, 2024 | 04:04 PM
चहा पिण्याचे नुकसान

चहा पिण्याचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

चहाशिवाय राहणं अनेकांना कठीण ठरतं, कारण ते त्यांचे आवडते पेय आहे. भारतात पाण्यानंतर जर सर्वाधिक कोणते पेय पिण्यात येत असेल तर ते म्हणजे चहा. चहा केव्हाही पिऊ शकत असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही असे अनेकदा अभ्यासातून सिद्ध झाले आहे. 

दुपारी अनेकदा ऑफिसमध्ये जेवल्यानंतर झोप येते. तर घरीदेखील जेवल्यानंतर आळस येतो आणि काम आहे म्हणून चहा प्यायला जातो. मात्र, पोषणतज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, जर तुम्ही दुपारी चहा प्यायला तर तुमच्या आरोग्याचे काय नुकसान होऊ शकते. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock) 

झोपेवर नकारात्मक परिणाम 

चहा पिण्याने झोपेवर परिणाम

दुपारी चहा प्यायल्याने झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. चहामध्ये असलेले कॅफिन हे एक नैसर्गिक उत्तेजक आहे जे मेंदूला जागृत ठेवते. दुपारी चहा प्यायल्याने झोप उडते हे खरं असलं तरीही दिवसभर विश्रांती घेणे कठीण होऊ शकते आणि याशिवाय दिवसभराची झोपेची गुणवत्ता कमी होऊ शकते. याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हेदेखील वाचा – जेवणानंतर लगेच झोप येते? अतिशय घातक ठरू शकते ही सवय, वाचा काय आहे कारण

पचनक्रियेमध्ये बाधा 

पचनक्रियेला येते बाधा

चहामध्ये टॅनिन असतात, जे पचन प्रक्रियेवर परिणाम करू शकतात. दुपारी चहा प्यायल्याने ॲसिडीटी, गॅस आणि पोटात जळजळ यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास या समस्या आणखी वाढू शकतात. हे आपल्या दैनंदिन जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते.

लोह शोषण्यास त्रास 

शरीरात पुरेसे लोह मिळत नाही

चहामध्ये टॅनिन आणि इतर संयुगे असतात जे आपल्या शरीरातील लोहाचे शोषण कमी करू शकतात. दुपारच्या जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने अन्नातील लोह योग्य प्रकारे शोषले जाण्यास प्रतिबंध होतो. यामुळे लोहाची कमतरता होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेदेखील वाचा – जर तुम्हाला रात्री शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी या 6 प्रकारच्या हर्बल चहा प्या, लगेच येईल झोप!

मूड स्विंग्ज

चहा सतत पिण्याने मूड स्विंग्ज होतात

कॅफिनच्या अतिसेवनामुळे आपल्या मूडवरही परिणाम होतो. दुपारी चहा प्यायल्याने मूड स्विंग, चिडचिड आणि निद्रानाश होऊ शकतो. कॅफीनमुळे निर्माण होणाऱ्या झटपट ऊर्जेनंतर येणारा थकवा आणि आळसही आपल्या मूडवर परिणाम करू शकतो. त्यामुळे सतत चिडचिड होऊन नात्यावरही परिणाम होतो. 

डिहायड्रेशनचा धोका 

डिहायड्रेशनचा होतो त्रास

चहामध्ये कॅफिन असते जे लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. याचा अर्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन वारंवार लघवीला जावे लागते. दुपारी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो, विशेषतः तुम्ही पुरेसे पाणी न पिण्याने अधिक त्रास होऊ शकतो. 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Drinking tea in the afternoon can be harmful for our body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे
1

Baby Care: थंडीच्या दिवसांत Premature बाळाची काळजी घेण्याची पद्धत, सर्दी – खोकल्याचा धोका टाळण्यासाठी काय करावे

शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती! आयुर्वेदातील अमृत, आजार राहतील चार हात लांब
2

शरीरात सडलेली घाण त्वरीत बाहेर फेकेल ‘ही’ औषधी वनस्पती! आयुर्वेदातील अमृत, आजार राहतील चार हात लांब

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव
3

Explainer: महिलांपेक्षा पुरुषांवर Attack का करतात कुत्रे? कसा वाचवाल जीव

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट
4

Metabolic Syndrome काय आहे? Metabolism उत्तम ठेवण्याला द्या प्राधान्य, Thyroid आरोग्‍य राहील परफेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.