Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fatty Liver: भारतात वाढतेय फॅटी लिव्हरचे प्रमाण; लठ्ठपणा आणि मधुमेहाशी थेट संबंध, तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

फॅटी लिव्हर हे भारतात सध्या जास्त वाढत जाणारी समस्या दिसून येत आहे. याशिवाय त्याचा लठ्ठपणा आणि डायबिटीसशी थेट संबंध येत असून तज्ज्ञांनी धोक्याचा इशारा दिलाय. जाणून घ्या महत्त्वाची माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 22, 2026 | 05:25 PM
फॅटी लिव्हरचा नक्की काय होतोय परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

फॅटी लिव्हरचा नक्की काय होतोय परिणाम (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • भारतात वाढत आहे फॅटी लिव्हरचे प्रमाण
  • लठ्ठपणा आणि डायबिटीसवर होतोय थेट परिणाम
  • तज्ज्ञांनी दिला इशारा 
फॅटी लिव्हर हा आज भारतीय कुटुंबांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आरोग्याचा गंभीर प्रश्न ठरत आहे. अनेकांना आपण या आजाराने ग्रस्त असल्याची कल्पनाही नसते. पूर्वी केवळ मद्यपानामुळे होणारा हा आजार अशी ओळख असलेला फॅटी लिव्हर आज प्रामुख्याने लठ्ठपणा आणि चयापचयातील (मेटाबॉलिक) बिघाडामुळे वाढत असून, भारतीय पुरुषांमध्ये त्याचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डॉ. अपर्णा गोविल भास्कर,येथील लॅप्रोस्कोपिक व बॅरियाट्रिक सर्जन, मेटाहील क्लिनिक, मुंबई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मेटाहीलच्या बॅरियाट्रिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये करण्यात आलेल्या एका भारतीय अभ्यासानुसार देशातील सुमारे ३८.६ टक्के प्रौढ नागरिकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) हा आजार आहे. या आजाराला आता मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टिअॅटोटिक लिव्हर डिसीज (MASLD) असे संबोधले जाते. लठ्ठपणा, मधुमेह किंवा या दोन्ही समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक आहे.

काय सांगतो अभ्यास

दक्षिण भारतातील गंभीर लठ्ठपणामुळे बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांवरील अभ्यासात जवळपास ६६ टक्के रुग्णांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या आढळून आली आहे. चेन्नईतील एका आरोग्य संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेत फॅटी लिव्हरचा धोका १.५९ पट अधिक आहे.

Fatty Liver ने सडतंय शरीर, तर 5 गोष्टींची घ्या त्वरीत काळजी; करा डिटॉक्स

यकृताच्या कर्करोगाचा धोका 

यकृत हे केवळ पचनसंस्थेचा भाग नसून शरीरातील चयापचय प्रक्रियेचे महत्त्वाचे केंद्र आहे. विशेषतः पोटाभोवती साचणारी अतिरिक्त चरबी शरीराच्या क्षमतेपेक्षा वाढू लागल्यास तिचा साठा यकृतात होऊ लागतो. कालांतराने ही चरबी यकृतामध्ये दाह निर्माण करते आणि मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिअॅटोहेपेटायटिस (MASH) या गंभीर अवस्थेकडे वाटचाल होते. पुढे यामुळे लिव्हर फायब्रोसिस, सिऱ्होसिस आणि काही प्रकरणांमध्ये यकृताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

नक्की चिंता कोणती?

फॅटी लिव्हरची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या आजाराची बहुतेक वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे यकृताचे नुकसान झाल्यानंतरच याची माहिती मिळते. नियमित लिव्हर फंक्शन चाचण्यांमध्येही अनेकदा कोणतीही असामान्यता दिसून येत नाही. अल्ट्रासाऊंड किंवा फायब्रोस्कॅनसारख्या तपासण्यांमधूनच यकृतात चरबी साचल्याचे निदान होते.थकवा, पोटातील अस्वस्थता किंवा इतर तपासण्यांदरम्यान या आजाराविषयी निदान होऊ शकते आणि तोपर्यंत  तो अनेकदा प्रगत अवस्थेत पोहोचलेला असतो.

अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन न करून सुद्धा Fatty liver चा त्रास वाढला आहे? लिव्हरचे आजार टाळण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ

फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावे?

  • वजन नियंत्रणात ठेवणे : शरीराच्या वजनात ७ ते १० टक्के घट झाल्यास यकृतातील चरबी आणि दाह लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
  • साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा : प्रक्रिया केलेले पदार्थ, शर्करायुक्त पेय आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड्स यकृतासाठी हानिकारक ठरतात.
  • नियमित व्यायाम करा : आठवड्यात किमान १५० मिनिटे एरोबिक व्यायाम केल्याने वजन कमी नाही झाले तरी यकृतातील चरबी कमी होण्यास मदत होते. त्यासोबत स्ट्रेंथ ट्रेनिंगचा देखील फायदा होतो.
  • वेळीच तपासणी करा : ३० वर्षांवरील, पोटाभोवती चरबी असलेल्या, मधुमेह किंवा ट्रायग्लिसराइड्स वाढलेल्या पुरुषांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लिव्हर अल्ट्रासाऊंड आणि फायब्रोस्कॅन करून घ्यावा.
  • औषधं आणि बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया : गंभीर लठ्ठपणा असलेल्या रुग्णांमध्ये GLP-1 आधारित औषधे किंवा बॅरियाट्रिक शस्त्रक्रिया वजन कमी करण्याबरोबरच फॅटी लिव्हरची तीव्रता कमी करण्यास आणि आणि तो बरा होण्यास मदत होते
वेळेवर तपासणी हाच सर्वोत्तम उपाय

फॅटी लिव्हरची लगेचच लक्षण दिसून येत नाहीत आणि त्यामुळेच हा आजार वेगाने वाढत जातो. त्यामुळे वजन आणि मेटाबॉलिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहणे आणि नियमित तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

Web Title: Obesity and diabetes affected due to fatty liver rising high in india experts warn alarmingly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • Fatty Liver
  • Health Tips
  • obesity

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
2

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
3

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
4

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.