'या' विटामिनच्या कमतरतेमुळे ओठांवर वाढू लागतो काळेपणा
सर्वच महिला सुंदर दिसण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. कधी फेशिअल करून त्वचेचे सौंदर्य वाढवले जाते तर कधी वेगवेगळ्या प्रकारचे लीप स्क्रब लावून ओठांवर वाढलेली डेड स्किन कमी करतात. पण हल्ली धूळ, माती आणि प्रदूषणामुळे आरोग्यासोबतच त्वचेचेसुद्धा सौंदर्य कमी होऊन जाते. चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. वारंवार ओठांवर लिपस्टिक लावणे, जेनेटिक्स, ओठांवर सनस्क्रीनचा वापर न करणे, अतिप्रमाणात सिगारेट ओढणे, ड्राय ओठांवर जीभ फिरवणे किंवा ओठांची सुकलेली त्वचा ओढून काढणे इत्यादी अनेक कारणामुळे ओठ अतिशय निस्तेज आणि काळे वाटू लागतात. पण बऱ्याचदा शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता ओठांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.(फोटो सौजन्य – istock)
संपूर्ण शरीरासाठी विटामिन बी १२ अतिशय महत्वाचे आहे. शरीरात या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय त्वचा, केस आणि ओठांचे सौंदर्य खूपच खराब होऊन जाते. विटामिन बी १२ कमी झाल्यानंतर लाल रक्त पेशींचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे शरीरात अनेक अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम ओठांवर लगेच दिसून येतो. ओठ काळे होणे, त्वचा काळवंडून जाणे, त्वचेवर काळे डाग येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.
शरीरामध्ये आयर्नची कमतरता निर्माण झाल्यानंतर रक्तातील ऑक्सिजन कमी होऊ लागते. ज्याचा परिणाम ओठांवर सुद्धा लगेच दिसून येतो. ओठांपर्यंत ऑक्सिजन कमी पोहचते, मेलानिनच्या उत्पादन निर्मितीत बदल होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेकांच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊन जाते. ओठांच्या रंगात बदल झाल्यानंतर सुद्धा अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.
झिंकच्या कमतरतेमुळे ओठ पूर्णपणे खराब होऊन जातात. ओठांवर काळेपणा वाढतो, ओठांची त्वचा कोरडी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. याशिवाय ओठांमधील ओलावा नष्ट होऊन ओठ अतिशय कोरडे पडून जातात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेली झिंकची कमतरता भरून काढण्यासाठी कडधान्य, नट्स, सीड् आणि दुग्धजन्य पदार्थांचे आहारात सेवन करावे.
ओठांची काळजी घेणे का महत्वाचे आहे
ओठांची काळजी घेणे महत्वाचे आहे कारण ओठ शरीराचा एक नाजूक भाग आहे आणि त्यांना योग्य पोषण आणि संरक्षण देणे आवश्यक आहे. ओठांची काळजी न घेतल्यास ते कोरडे, फाटलेले किंवा काळे पडू शकतात.
ओठांची काळजी कशी घ्यावी?
ओठांना सतत मॉइश्चराइझ (moisturize) ठेवा. यासाठी लिप बाम (lip balm) वापरा. भरपूर पाणी प्या, ज्यामुळे तुमचे शरीर आणि ओठ हायड्रेटेड (hydrated) राहतील. ओठांना वारंवार चाटणे टाळा, कारण यामुळे ओठ अधिक कोरडे होऊ शकतात. धूळ आणि सूर्यप्रकाश (sun exposure) टाळण्यासाठी बाहेर जाताना स्कार्फ किंवा टोपी वापरा.
ओठांवर पांढरे डाग का येतात?
ओठांवर पांढरे डाग येणे हे व्हिटिलिगो (त्वचेचा रंग कमी होणे) नावाच्या समस्येमुळे असू शकते. त्वचेच्या या समस्येमुळे ओठांवर किंवा शरीराच्या इतर भागांवर रंगद्रव्य (pigment) कमी होते.