ओपन पोर्समुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग गुलाबाच्या पाकळ्यांचा 'या' पद्धतीने करा वापर
हवामानात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, अपुरी झोप आणि आहारातील बदलांमुळे आरोग्यासह त्वचासुद्धा लगेच दिसून येतो. डोळ्यांखाली आलेले काळे डाग, पिंपल्स, ऍक्ने, फोड आणि ओपन पोर्समुळे त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. संपूर्ण चेहऱ्यावर अतिशय बारीक बारीक छिद्र असतात. या छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यानंतर पिंपल्स, फोड किंवा बारीक बारीक बारीक मुरूम येऊ लागतात. हे पिंपल्स त्वचेवरून लवकर निघून जात नाहीत. त्वचेवर वाढलेल्या ओपन पोर्समुळे त्वचा अतिशय म्हातारी आणि निस्तेज दिसू लागते. चेहऱ्यावरील ग्लो पूर्णपणे कमी होऊन जातो.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ त्वचेसाठी ठरतील वरदान! पिंपल्स, मुरूम होतील कायमचे गायब
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील आद्रतेचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचा अतिशय तेलकट आणि निस्तेज दिसू लागते. त्वचेच्या छिद्रांमध्ये घाण जमा झाल्यानंतर मोठे मोठे फोड येऊ लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केल्यामुळे त्वचा कायमच ग्लोइंग दिसते. त्वचेवर पिंपल्स किंवा ऍक्ने येत नाहीत. गुलाब पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते.
त्वचेवर वाढलेले ओपन पोर्स त्वचा निस्तेज आणि रुक्ष करून टाकतात.हे ओपन पोर्स कमी करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करावा. घरगुती उपाय त्वचा कायमच हायड्रेट आणि निरोगी ठेवतात. टोपात पाणी गरम करून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून पाणी उकळवून घ्या. तयार केलेले पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये आणि बाटलीमध्ये स्टोर करून ठेवा. बर्फाचा ट्रे ४ किंवा ५ तासांसाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या. तयार केलेले गुलाबाच्या पाकळ्यांचे पाणी वाटीमध्ये घेऊन त्यात तुरटी, लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेल्या पाण्यात चेहरा संपूर्ण भिजवून घ्या. हा उपाय ५ ते ६ वेळा नियमित केल्यास त्वचेच्या सर समस्या दूर होतील.
चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर न करता घरगुती उपाय करावे. त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी तुरटी अतिशय प्रभावी ठरते. याशिवाय लिंबाच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग किंवा घाण स्वच्छ होण्यास मदत होते. गुलाबाच्या पाकळ्या त्वचेवर नैसर्गिक चमक कायमच टिकवून ठेवतात. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये टीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात.