Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

COPD च्या उपचारासाठी लवकर निदान होणे गरजेचे, काय आहे नक्की हा आजार; तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

COPD अर्थात क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा दीर्घकालीन श्वसनरोग असून याविषयी सध्या जागरुकता करणे गरजेचे आहे. यासाठी मुळात त्याचे लवकर निदान होणे गरजेचे आहे, कसे ते जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2025 | 07:15 PM
COPD चे संकेत आधी कळणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)

COPD चे संकेत आधी कळणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • COPD नक्की कोणता आजार आहे 
  • डॉक्टरांनी काय सांगितले
  • लवकर निदान झाल्यास काय करावे 
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) (सीओपीडी) हा एक दीर्घकालीन श्वसन रोग आहे, ज्यामध्ये वायुप्रवाहाला अडथळा येऊन श्वास घेण्यास त्रास होतो. भारतात सीओपीडी ही आरोग्यासाठी एक महत्त्वाची चिंता आहे. 37.8 दशलक्ष प्रकरणांसह, मृत्यू आणि अपंगत्व घेऊन जगावे लागणाऱ्या आयुष्याचे हे दुसरे प्रमुख कारण आहे. तरीदेखील, सीओपीडीची कारणे, लक्षणे आणि उपचारांबद्दल जागरूकता नसल्यामुळे त्याचे निदान अनेकदा होत नाही ज्यामुळे व्यवस्थापन करताना अडथळे येतात. 

सीओपीडी समजून घेताना कोल्हापूर येथील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. पृथ्वीराज राजेंद्र मेठे सांगतात की, सीओपीडीला सामान्यतः एम्फिसीमा किंवा क्रॉनिक ब्राँकायटिस असे म्हणतात. एम्फिसीमामध्ये फुफ्फुसातील वायुमार्गाच्या शेवटी असलेल्या लहान वायुकोशांचे नुकसान होते तर क्रॉनिक ब्राँकायटिसमध्ये श्वसनमार्गामध्ये जळजळ झाल्यामुळे श्लेष्मा येऊन सतत खोकला येतो.  घरातील प्रदूषण (जसे की स्वयंपाकाच्या चुलीचा धूर), बाहेरील प्रदूषण आणि विशेषतः  शेतीमधल्या हानिकारक पदार्थांचा व्यावसायिक संपर्क यांसारख्या कारणांमुळे सीओपीडी होऊ शकतो. तथापि, धूम्रपान हा सर्वात महत्त्वाचा जोखीम घटक आहे. श्वास घेण्यास त्रास होणे आणि कफसह दीर्घकालीन खोकला ही सामान्य लक्षणे आहेत.

World COPD Day: फुफ्फुसाचा हा गंभीर आजार कान, घसा, नाक करेल निकामी, काय आहेत लक्षणं

लवकर निदान होण्याची महत्त्वाची भूमिका

सीओपीडीचा प्रसार हळूहळू होत असल्याने, लक्षणे हळूहळू दिसतात आणि कालांतराने आरोग्य बिघडते ज्यामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूण जीवनमान कमी होते.  यामुळे चालणे किंवा जेवण तयार करणे यासारखी मूलभूत रोजची कामे करण्याची क्षमता मर्यादित होते. गंभीर प्रकरणांमध्ये, लक्षणे पटकन वाढल्याने अथवा बिघडल्याने सीओपीडीचा त्रास वाढू शकतो किंवा फुफ्फुसांचा झटका येऊ शकतो, ज्यातून बरे होण्यासाठी एक महिनाभराचा  कालावधी लागू शकतो. 

जर सीओपीडीची तपासणी झाली नाही तर, तो फुफ्फुसांचा कर्करोग आणि न्यूमोनियासारख्या संसर्गांसह जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे, सीओपीडीमुळे उच्च रक्तदाब, कोरोनरी धमनी रोग आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयरोग देखील होऊ शकतात.

सीओपीडीचे निदान

जरी सीओपीडीचा धूम्रपानाशी जवळचा संबंध असला तरी, सीओपीडी हा केवळ “धूम्रपान करणाऱ्यांचा आजार” नाही.  जोखीम घटकांमध्ये लहानपणी वारंवार झालेले श्वसन संक्रमण, घरातील प्रदूषकांचा संपर्क, वायू प्रदूषण, सेकंड हॅन्ड स्मोक आणि कामाच्या ठिकाणी असणारे प्रदूषक यांचा समावेश असतो. लक्षणे तपासत, वैद्यकीय इतिहासाचे मूल्यांकन करत आणि शारीरिक तपासणी करत याचे निदान करता येऊ शकते . 

प्रमुख निदान साधन म्हणजे स्पायरोमेट्री आहे – एक अशी चाचणी जी व्यक्ती किती श्वासावाटे किती हवा घेऊ शकते आणि सोडू शकते हे मोजते, या चाचणीमुळे फुफ्फुसांच्या कार्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होते. तथापि, अनेक निदान केवळ रुग्णांच्या इतिहासावर अवलंबून असतात, ज्यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णांची संख्या कमी होते. स्पायरोमेट्री चाचणीचे मानकीकरण वेळेवर आणि अचूक निदान सुनिश्चित करू शकते.

फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

सीओपीडीचे व्यवस्थापन आणि जीवनमान

जरी सीओपीडी संबंधित आजाराने फुफ्फुसांचे झालेले नुकसान भरून काढता येत नाही, परंतु जीवनशैलीतील बदल आणि योग्य उपचारांनी लक्षणे व्यवस्थापित केली जाऊ शकतात आणि रोगाची फैलाव कमी करता येऊ शकतो. श्वासावाटे घेण्यात येणारी औषधे, विशेषतः ब्रोन्कोडायलेटर इनहेलर्स, श्वसनमार्गांना आराम देण्यास आणि श्वास घेण्यास सुलभ करण्यास मदत करतात. नेब्युलाइज्ड उपचार आणि फुफ्फुसीय पुनर्वसन कार्यक्रमामुळे ऑक्सिजन घेण्याचे प्रमाण सुधारते, धाप लागण्याचे प्रमाण कमी होते आणि जीवनाची गुणवत्ता वाढवते.

जागरूकता वाढवणे

लवकर निदान करणे आणि स्वतःची काळजी घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, रुग्णांना चालना आणि चेतावणीची चिन्हे ओळखता यायला हवीत. लवकर निदान आणि उपचारांच्या फायद्यांबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी जागरूकता उपक्रम आणि रुग्ण समर्थन कार्यक्रम  करणेआवश्यक आहेत. संपूर्ण भारतात सीओपीडीचे परिणाम सुधारण्यासाठी, जागरूकता आणि वेळेवर कारवाईची सांगड घालणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Early diagnosis is essential for the treatment of copd what exactly is this disease experts give important advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • chronic diseases
  • Health Tips

संबंधित बातम्या

1 दिवसात किती मसाला चहा पिणे योग्य? दुधाचा चहा जास्त पिण्याने काय होते नुकसान, डॉक्टरांनी दिला इशारा
1

1 दिवसात किती मसाला चहा पिणे योग्य? दुधाचा चहा जास्त पिण्याने काय होते नुकसान, डॉक्टरांनी दिला इशारा

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण
2

लिव्हरमध्ये अडकलेला सर्व कचरा आपोपाप पडेल बाहेर, आचार्य बाळकृष्णांनी सांगितला उपाय; फॅटी लिव्हरसाठी ठरेल रामबाण

महिलांसाठी ‘Stamina’ आणि ताकद देणारे ठरतात 3 छोटुसे दाणे, अनेक समस्यांवरील रामबाण उपाय
3

महिलांसाठी ‘Stamina’ आणि ताकद देणारे ठरतात 3 छोटुसे दाणे, अनेक समस्यांवरील रामबाण उपाय

मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही
4

मासिक पाळीपूर्वी वा नंतर होत असेल ‘White Discharge’, तज्ज्ञांकडून जाणून घ्या नॉर्मल आहे की नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.