गर्भाशयाच्या कॅन्सरची पाहिल्यात टप्प्यात दिसून येणारी लक्षणे:
कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. मागील काही वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॅन्सर झालेली व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्टया पूर्णपणे खचून जाते. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. 200 पेक्षा जास्त कॅन्सरचे प्रकार आहेत. त्यातील प्रामुख्याने महिलांमध्ये आढळून येणारा कॅन्सरचा प्रकार म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर. गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये सामान्य लक्षणे दिसून येतात. गर्भाशयाचा कॅन्सर मानवी पॅपिलोमा विषाणूची लागण झाल्यामुळे होतो. एचपीव्ही विषाणू शरीरात बराच काळ राहतो आणि नंतर त्याचे रूपांतर कॅन्सरच्या पेशींमध्ये होते.(फोटो सौजन्य – iStock)
लघवीच्या रंगात बदल जाणवतोय? किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे
गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. मासिक पाळीमध्ये होणारा जास्त रक्तस्रावाकडे अनेक महिला दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीराच्या आतील अवयवयांमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात. या आरोग्यासाठी अतिशय जीवघेण्या ठरतात. कॅन्सरच्या पहिल्या टप्प्यात शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे लक्ष दिल्यास कॅन्सरसारखा जीवघेणा आजार देखील बरा होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात तीव्र पोट दुखी होण्यास सुरुवात होते. याशिवाय ओटीपोटात तीव्र वेदना होऊ लागतात. याशिवाय जेवल्यानंतर पोट देखील जास्त भरल्यासारखे वाटू लागते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये योनीमार्गातून जास्त रक्तस्त्राव होत असल्यास अनेक महिला सामान्य लक्षणे समजून दुर्लक्ष करतात. मात्र गर्भाशयाच्या कॅन्सरचे हे सुरुवातीच्या टप्पात दिसणारे लक्षणं आहे. नियमित चक्राच्या बाहेर किंवा रजोनिवृत्तीनंतर असामान्य रक्तस्त्राव झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
मुत्राशयावरील वाढत्या ट्युमरमुळे वारंवार लघवीला जावे लागते. याशिवाय वाढत्या गाठींमुळे मूत्राशयावर ताण येतो, ज्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. तसेच गाठींचा आकार वाढल्यानंतर लघवीमधून रक्त येऊ लागते. रक्ताच्या गाठी येऊ लागल्यानंतर देखील महिला दुर्लक्ष करतात. असे न करता योग्य ते औषध उपचार करावे.
शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अचानक वजन कमी होऊन लागते. वजन कमी झाल्यानंतर भूक न लागणे, कोणताच पदार्थ खाण्याची इच्छा न होणे, पचनक्रिया बिघडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कॅन्सर झाल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नये.