किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात 'ही' गंभीर लक्षणे
चुकीची जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन,अपुरी झोप, सतत धूम्रपान करणे, शरीरात व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी शरीरातील सर्वच अवयवनाचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे.शरीरातील सगळ्यांत महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे काम किडनीं करते. मूत्रपिंडासंबंधित कोणतीही समस्या उद्भवू लागल्यानंतर किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी किडनीचे कार्य सुरळीत असणे आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – iStock)
किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराचे कार्य पूर्णपणे बिघडून जाते. मूत्रमार्गातील संसर्गात वाढ झाल्यामुळे किडनीच्या कार्यवर परिणाम होतो. हल्ली अनेकांमध्ये किडनीसंबंधित समस्या उद्भवू लागल्या आहेत. मूत्रपिंडाचा संसर्ग म्हणजे यूटीआय. हा आजार मुत्राशयातून मूत्रपिंडात पोहचतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला किडनी संसर्ग झाल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.
मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यानंतर अनेकदा लघवीमध्ये वेदना होणे किंवा लघवी करताना जळजळ होऊ लागते. किडनीचे कार्य बिघडल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये लघवीमध्ये वेदना होणे हे सामान्य लक्षणं आहे. या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मात्र दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
किडनी संसर्ग झाल्यानंतर किंवा मूत्रपिंडाचा संसर्ग झाल्यानंतर लघवीचा रंग बदलू लागतो. लघवीचा रंग तपकिरी किंवा रंग हलका गुलाबी किंवा लाल दिसू शकतो. याशिवाय जास्त प्रमाणात संसर्ग शरीरात पसरल्यामुळे लघवीमधून रक्त येऊ लागते. ही समस्या जाणवू लागल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लघवीचा रंग बदलू लागल्यानंतर दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार घ्यावे.
अनेकदा शरीरात कोणत्याही आजाराची लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र तरीसुद्धा सतत उलटी सारखे वाटणे किंवा मळमळ वाटू लागते. मूत्रपिंडाच्या संसर्गाचे हे प्रमुख लक्षणं आहे. मूत्रपिंडाचे कार्य बिघडल्यानंतर शरीरामध्ये विषारी घटक जमा होऊन राहतात, ज्यामुळे उलटी किंवा मळमळल्या सारखे वाटू लागते. शरीरामध्ये वारंवार ही लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मात्र किडनीच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यानंतर सतत ताप येणे किंवा थंडी वाजणे इत्यादी समस्या उद्भवू लागतात. थंडी वाजून ताप आल्यानंतर शरीराचे तापमान १०० पेक्षा जास्त असते. सतत थंडी ताप आल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. शरीरात वरील लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचण्या करून घ्याव्यात.