
घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
पुदिन्याच्या तेलाचा वापर
असं म्हणतात की, उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही. याचा तीव्र वास त्यांना असहाय्य करतो आणि ते घर सोडून पळून जातात. उंदरांना घरातून पळवून लावण्यासाठी तुम्ही पुदिन्याच्या तेलाचा वापर करु शकता. घरातील कोपऱ्यानकोपऱ्यात हे तेल थोडेसे शिंपडा आणि मजा पाहा. काही दिवसांनी या तेलाच्या उग्र वासाने उंदिर स्वत:च घरातून पळून जातील.
लाल मिरची पावडर
लाल मसाल्याचा वापर फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर याच्या मदतीने घरातील उंदरांनाही पळवून लावले जाऊ शकते. घरातील ज्या भागांमध्ये उंदरांचा वावर सर्वाधित आहे त्या भागात लाल मसाला शिंपडा. लाल मसाल्याचा उग्र वास उंदरांना सहन होणार नाही आणि ते घरातून निघून जाण्याचा निर्धार करतील.
कांद्याचा वापर
उंदरांना स्वयंपाकघरातील काही पदार्थ अजिबात आवडत नाही आणि त्यातीलच एक म्हणजे कांद्याचा उग्र वास. कांद्याचा तिखट आणि तीव्र वास उंदरांना सहन करता येत नाही. तुम्ही उंदरांच्या बिळाजवळ किंवा उंदरांचा वावर ज्या ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणी कांद्याचे काही तुकडे पसरवून ठेवू शकता. कांद्याच्या या वासामुळे उंदीराला त्रास होऊ लागेल आणि तो घरातून निश्चितच बाहेर पडेल.
कापूर वापरा
घरात पूजेसाठी वापरला जाणारा कापूर देखील उंदरांना पळवून लावण्यास मोठी मदत करेल. याच्या उग्र वासात उंदरांचा श्वास गुदमरु लागतो ज्यामुळे ते मोकळ्या हवेच्या शोधात घराबाहेर पडू लागतात. यासाठी फक्त कापूराच्या काही गोळ्या घरातील कोपऱ्यात, दरवाज्यांमागे किंवा कपाटाच्या आत टाकून ठेवा.
लसणाच्या पाकळ्या
लसणाचा वास देखील उंदरांना सहन करता येत नाही. याचा उग्र वास त्यांना नकोसा करतो आणि ते घराबाहेर पडण्याचा विचार करु लागतात. लसणाच्या काही पाकळ्या बारीक ठेचून पाण्यात मिसळा आणि मग स्प्रे बाॅटलमध्ये पाणी भरुन हे पाणी घरातील कोपऱ्यांमध्ये शिंपडा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसणाच्या काही पाकळ्याही घरातील कोपऱ्यात ठेवू शकता.
साफसफाई करा
या उपायांसोबतच लक्षात ठेवा की, आपल्या घरातील स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची असते. रात्रीच्या वेळी खरकाटी भांडी सिंकवर साफ न करता ठेवू नका. जेव्हा उंदरांना जेवण मिळणार नाही तेव्हा ते स्वत:च घराच्या बाहेरचा रस्ता बघतील.