Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Weight Loss Tips : वाढते वजन कमी करण्यासाठी अनेकजण चहा किंवा कॉफीचा आधार घेतात. पण या दोन्ही पेयांपैकी कोणते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते? संशोधनातून याबाबत काय समोर आले, जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2026 | 08:15 PM
ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

ग्रीन टी की ब्लॅक कॉफी? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय आहे सर्वात सर्वोत्तम?

Follow Us
Follow Us:
  • वजन कमी करण्यासाठी कोणते पेय ठरू शकते उपयुक्त?
  • चहा आणि कॉफीचा शरीरावर कसा होतो परिणाम?
  • संशोधनातून वजन नियंत्रणाबाबत काय समोर आले?
वाढते वजन अनेकांसाठी समस्या बनली आहे. वजन वाढतं तर फार वेगाने पण कमी फार संथ गतीने होतं. अतिसेवन, चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव हे वजन वाढण्याचे काही सामान्य कारणे आहेत. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी काही पेयांचे सेवन फायदेशीर मानले जाते. यात ग्रीन टी आणि ब्लॅक टी यांचा समावेश होतो. आता प्रश्न असा पडतो की, आपल्याला जर फक्त एकाच ड्रिंकचे सेवन करायचे असेल तर यात निवड कशाची करावी. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्या ड्रिंकच्या सेवनाने वजन झटपट कमी करण्यास मदत होईल ते आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी

ग्रीन टीच्या सेवनाने वजन कमी करण्यास किती मदत होईल?

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन (Catechins) नावाचे एंटीऑक्सीडंट असते. यात EGCG नावाचे तत्वदेखील सामील असते. ग्रीन टीमध्ये काही प्रमाणात कॅफेन देखील असते. हे दोन्ही शरीराच्या ऊर्जा वापरावर आणि चरबीच्या वापरावर परिणाम करू शकतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ (NIH) ऑफिस ऑफ डाइटरी सप्लीमेंट्सनुसार, ग्रीन टीमुळे वजन कमी करण्यास मोठी मदत होते. तथापि, याचा परिणाम फार काळ होत नाही, म्हणजेच वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टीवर निर्भर राहणे योग्य नाही. यामुळे पोटावरील चरबी कमी होण्याची अपेक्षा करणे योग्य नाही.

ब्लॅक काॅफी वजन कमी करण्यास करेल मदत?

ब्लॅक काॅफीत कॅफिन नावाचे घटक असते जे झोप उडवण्यास आणि थकवा दूर करण्यास मदत करते. शरीरातील ऊर्जा खर्चावरही कॅफीनचा परिणाम होत असतो. हेच कारण आहे की, काही लोक वर्कआउट दरम्यान ब्लॅक काॅफी पिणे अधिक पसंत करतात. तथापि, वजन कमी करण्यासाठी ब्लॅक काॅफी म्हणजे कोणता जाईदु उपाय नाही. काॅफीच्या सेवनाने पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते पण यामुळे वजन कमी होण्यात फारशी मदत होत नाही. याउलट तुम्ही दररोज किती कॅलरीजचे सेवन करत आहात आणि किती कॅलरीज खर्च करत आहात यावर तुमचे वजन अवलंबून असते.

Facecare Routine: त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त १० मिनिटे फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स, त्वचा होईल स्वच्छ

ब्लॅक काॅफी की ग्रीन टी, रिसर्च काय सांगते?

British Journal of Nutrition ने २०२४ साली प्रकाशित केलेल्या सिस्टमॅटिक रेव्हू आणि नेटवर्क मेटा-एनालिसिसमध्ये चहा आणि काॅफीमुळे वजनावर पडणाऱ्या फरकावर भाष्य केले होते. यामध्ये २२ यादृच्छिक चाचण्या आणि १,७१० प्रौढांचा समावेश होता. रिसर्चमध्ये ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास थोडी मदत झाल्याचे दिसले. तथापि, पुराव्याची गुणवत्ता मात्र कमी होती. दुसरीकडे काॅफीमुळे वजन कमी होण्यावर फारसा काही बदल दिसून आला नाही. याचाच अर्थ असा आहे की, काॅफी आणि ग्रीन टीमध्ये वजन कमी करण्यासाठी अधिक लाभदायक ग्रीन टी ठरतो. पण वजन कमी करण्यासाठी फक्त हेच पुरेसे नाही तर थोडा व्यायाम आणि पाैष्टिक आहाराचे सेवन देखील महत्त्वाची भूमिका बजावते.

 

Web Title: Green tea vs black coffee for weight loss research health benefits nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Weight loss

संबंधित बातम्या

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
1

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
2

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय
3

Sore Throat Remedies: सर्दी-खोकल्याने घसा दुखतोय, बोलणंही कठीण झालंय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट
4

Weight Loss: पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी! भूक लागल्यानंतर ‘या’ पदार्थांचे आवर्जून करा सेवन, राहाल कायमच फीट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.