Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा लसूण चटणी, ‘या’ पद्धतीने बनवल्यास शरीराला होतील दुप्पट फायदे

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूण चटणीचे सेवन करावे. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया लसूण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 21, 2025 | 08:00 AM
रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा लसूण चटणी

रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा लसूण चटणी

Follow Us
Follow Us:

शरीरासाठी उच्च कोलेस्ट्रॉल अतिशय घातक ठरते. रक्तात वाढलेल्या खराब कोलेस्टरॉलमुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेल्या चिकट थरामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे दैनंदिन आहारात कायमच संतुलित आणि सहजपचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्ततर साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात लसूण चटणीचे सेवन का करावे? लसूण चटणी बनवण्याची कृती? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. यामध्ये असलेले घटक पदार्थाची चव वाढवण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढवतात. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट होऊन आरोग्य सुधारते. रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारा प्लेक कमी करण्यासाठी आणि रक्तप्रवाह सुधारण्यासाठी लसूण चटणी खावी. जाणून घ्या लसूण चटणी बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्ता करा पौष्टिक आणि चविष्ट, यंदा घरी बनवून खा ‘पालक चिला’; अवघ्या 10 मिनिटांची रेसिपी

साहित्य:

  • लसूण
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • जिरं
  • लिंबाचा रस
  • पाणी
पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा, पोट होईल स्वच्छ

कृती:

  • लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या. लसूणची साल काढल्यास पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.
  • मिक्सरच्या भांड्यात सोलून घेतलेला लसूण, कोथिंबीर, जिरं, मीठ, हिरवी मिरची आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी मोठ्या वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली झणझणीत लसूण चटणी.
  • लसूण चटणी तुम्ही चपाती, पराठा, भाकरी किंवा दाळ-भाताबरोबर खाऊ शकता. पण जास्त प्रमाणात लसूण चटणी अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळ वाढू शकते.

Web Title: Eat garlic chutney regularly to destroy bad cholesterol in the blood garlic benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • garlic

संबंधित बातम्या

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं
1

Bad Cholesterol: हेल्दी लाइफस्टाइल असूनही वाढतंय खराब कोलेस्ट्रॉल? जाणून घ्या खरी कारणं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.