पचनक्रिया राहील कायमच मजबूत आणि निरोगी! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट मुळ्याचा पराठा
हिवाळ्यात बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. दैनंदिन आहारात मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. मुळाच्या भाजी चवीला काहीशी तिखट असते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मुळ्याच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फोलेट, जीवनसत्त्व बी६,फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर पाणी असते. पचनाच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आठवड्यातून दोनदा पालेभाज्यांचे किंवा मुळाच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी मुळा अतिशय प्रभावी ठरतो. यामुळे शरीर स्वच्छ होते. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी मुळ्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मुळ्याचा पराठा चवीला अतिशय सुंदर लागतो. घाईच्या वेळी तुम्ही झटपट मुळ्याच्या भाजीपासून पराठा बनवू शकता. मुळ्याच्या सेवनामुळे शरीर सुद्धा हायड्रेट राहते. चला तर जाणून घेऊया मुळ्याचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)






