आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण सरकन पडून जाईल बाहेर!
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषध घेतात. पण या गोळ्या औषधांचे सेवन केल्यास काहीवेळा पुरता आराम मिळतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागते. शरीरात निर्माण झालेला गॅस, ऍसिडिटी किंवा पोटासंबंधित इतरही समस्या उद्भवतात. त्यामुळे रोजच्या आहारात शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
गुरू गौर गोपाल दास वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा आहेत फिट आणि तरुण! जाणून घ्या साधू संतांचा सिंपल डाएट
बद्धकोष्ठतेची समस्या वारंवार उद्भवू लागल्यास घरगुती उपाय करून आराम मिळवावा. यामुळे शरीर कायम स्वच्छ राहील. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्य बिघडते. यामुळे अपचन, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल. याशिवाय आरोग्य सुधारण्यास मदत होईल. आतड्यांमधील हालचाल कायमच निरोगी ठेवण्यासाठी फळांचे सेवन करावे.
पपईमध्ये असलेले फायबर आतड्यांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. पपईमध्ये पपेन नावाचा एंजाइम आढळून येतो. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. पोटात निर्माण झालेला गॅस, जडपणा जाणवणे किंवा कोणत्याही पदार्थ खाण्याची इच्छा न झाल्यास पपईचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये चिटकून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल. उपाशी पोटी पपईचे सेवन केल्यास पचनाची समस्या उद्भवणार नाही.
शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी मोसंबीचे सेवन करावे.मोसंबी खाल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मोसंबी किंवा मोसंबीचा रस प्याल्यास आतड्या सक्रिय राहतील. याशिवाय शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. त्यामुळे नियमित लिंबूवर्गीय फळांचे आहारात सेवन करावे. यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
शरीराच्या निरोगी आरोग्यासाठी अननसाचे सेवन करावे. यामध्ये ब्रोमेलिन नावाचे एंजाइम आढळून येतात. अननस खाल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते. जेवल्यानंतर बऱ्याचदा काहींना पोट जड झाल्यासारखे वाटू लागते. अशावेळी अननस खाल्यास पोटात हलके वाटेल. आतड्यांच्या निरोगी आरोग्यासाठी आहारात नियमित अननस खावा.