गुरू गौर गोपाल दास वयाच्या ५१ व्या वर्षीसुद्धा आहेत फिट आणि तरुण!
जगभरात फेमस असलेले अध्यात्मिक गुरू आणि मोटिव्हेशनल स्पीकर गुरु गौर गोपाल दास जगभरातील अनेकांचे गुरु आहेत. त्यांच्या नावाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांना जीवन जगण्याची नवीन आशा मिळाली आहे. ते कायमच तरुणांना प्रेरित करत असतात. त्यांचे बोलणे, त्यांचे विचार सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. गुरु गौर गोपाल दास यांचे वय ५१ वर्ष आहे. पण त्यांना पाहून तुम्हाला कधीच वाटलंही नसेल की त्यांच्या वय 51 वर्ष इतके आहे. त्यांचे राहणीमान, त्यांच्या चेहऱ्यावरील चमक आणि त्यांच्या फिटनेसची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. जेवण, व्यायाम, ध्यान, मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वच्छता इत्यादी गोष्टींवरील ठाम विश्वासामुळे ते वयाच्या 51 व्या वर्षी 20 वयातील तरुणाइतके सुंदर दिसतात. त्यांनी साधू जीवनशैली स्वीकारली आहे. त्याचा त्यांना दैनंदिन आयुष्य जगताना फारच फायदा झाला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या फिटनेसचे रहस्य.(फोटो सौजन्य – pinterest)
दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? जास्त वेळा होत असेल तर करू नका दुर्लक्ष
कायमच निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी स्किन केअर प्रॉडक्टची आवश्यकता नसते. आवश्यकता असते ती चांगले अन्नपदार्थ आणि आहाराची. पौष्टिक आणि सकस आहार घेतल्यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. गौर गोपाल दास यांनी सांगितल्यानुसार, जेवताना मोबाईल, टीव्ही, गप्पा हे सर्व बाजूला ठेवून फक्त जेवणाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे. यामुळे जेवलेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. प्रत्येक व्यक्तीचे अन्नासोबत असलेले नाते हे केवळ जेवण्यासाठीच नाहीतर मनासाठी सुद्धा असते. त्यामुळे जेवताना कायमच आनंदी राहावे.
जेवणाच्या ताटात सांधू संत कायमच हेल्दी आणि सात्त्विक अन्नपदार्थांचे सेवन करतात.हे पदार्थ शरीराला सहज पचन होतात. गौर गोपाल दास यांनी त्यांच्या आहारात कधीही तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ले नाहीच. त्यांच्या आहारात कायमच भाज्या, फळं, कडधान्य, भाकरी इत्यादी पारंपरिक पदार्थ असतात. सात्त्विक अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे मन शांत राहते, त्वचा, केस, पचन इत्यादी अनेक गोष्टींवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
पोटात साचलेल्या अॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा ‘हे’ पदार्थ, तात्काळ मिळेल आराम
गौर गोपाळ दास यांच्या मते, नियमित पोटभर जेवणे चुकीचे आहे. भुकेच्या ७५ टक्के नियमित जेवण केले पाहिजे. शरीराचा २५ भाग रिकाम्या ठेवल्यामुळे शरीरावर अतिरिक्त भार येत नाही. यामुळे शरीर कायमच निरोगी राहते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि संपूर्ण शरीराचे कार्यसुरळीत चालू ठेवण्यासाठी कायमच हेल्दी आणि अन्नपदार्थांचे सेवन वेळेवर करावे.