राणी मुखर्जी मुलीसाठी वापरते रिव्हर्स सायकॉलॉजी ट्रीक
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या अभिनयामुळे सगळीकडे फेमस आहे. ती केवळ अभिनयामुळेच नाहीतर तिच्या आईपणामुळे सुद्धा सगळीकडे प्रसिद्ध आहे. ती तिच्या मुलीची खूप जास्त काळजी घेते. राणी मुखर्जी तिच्या मुलांच्या आरोग्याची, आहाराची आणि इतर सर्वच गोष्टींची खूप जास्त काळजी घेते. सर्वच आईवडील आपल्या मुलांची खूप जास्त काळजी घेतात. मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कायमच देत असतात. मात्र बऱ्याचदा मुलं खूप काही महागड्या किंवा बाहेरील अन्नपदार्थ खाण्यासाठी हट्ट करतात. राणी मुखर्जी मुलीला हेल्दी अन्नपदार्थ देण्यासाठी एका सोप्या ट्रिकचा वापर करते. चला तर जाणून घेऊया नेमकी काय आहे ट्रीक.(फोटो सौजन्य – pinterest)
त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवून देईल तांदूळ तुरटीचा फेसमास्क, त्वचा आतून राहील हायड्रेट
राणी मुखर्जीने एका मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिची मुलगी आदिरा नेहमीच म्हणते, मम्मा, मला रसगुल्ला हवा आहे. मुलांना कोणत्याही गोष्टी देण्यासाठी आईवडील कधीच नकार देत नाहीत. मात्र तिने मुलांना गोड पदार्थांपासून दूर ठेवण्याचा एक नवीन ट्रेंड आणला आहे. त्यावर बोलताना ती म्हणाली साखर खाणे आरोग्यासाठी विषासमान आहे. पण मुलांना सर्व काही देण्यास नकार दिला तर मुलं अतिशय हट्टी होतात. म्हणून मी माझ्या मुलीला कधीही नकार देत नाही.
राणी मुखर्जीने पुढे बोलताना सांगितले की, मी तिला सांगते, ‘खा, खा,’ मग ती विचार करते, मम्मी खा का म्हणत आहे?’ यानंतर ती स्वतः विचार करते की चला आता कारले खाऊया.” रिव्हर्स सायकॉलॉजी हे असे मानसिक तंत्र आहे, ज्याच्यामुळे व्यक्तीला उलट सूचना देऊन काहीतरी करण्यास सांगितले जाते आणि त्या व्यक्तीला असे वाटते की हा त्याचाच निर्णय आहे. या निर्णयामुळे समोरील व्यक्ती त्याला हवे असणारे काम नैसर्गिकरित्या मनापासून करते. त्यामुळे तुम्हीसुद्धा या ट्रिकचा वापर तुमच्या मुलांसाठी करू शकता.
दिवसभरात किती वेळा लघवीला जाणे आरोग्यासाठी योग्य? जास्त वेळा होत असेल तर करू नका दुर्लक्ष
रिव्हर्स सायकॉलॉजी योग्य प्रकारे काम करते पण यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. यामुळे तुमची मुलं मोठ्या गोंधळात पडू शकतात. एवढेच नाहीतर दीर्घकाळ ते स्वीकारल्याने नात्यांमध्ये पारदर्शकता कमी होऊन जाते, ज्यामुळे आईवडील आणि मुलांमध्ये कायमचा दुरावा निर्माण होऊ शकतो.