
तुमची झोप हिरावून घेत आहे डार्क चॉकलेटचे सेवन, डॉक्टरांनी केलं सावध; यात नक्की असतं तरी काय?
डार्क चॉकलेटमध्ये काय असते ?
डॉ. सांगतात की डार्क चॉकलेटमध्ये कोको जास्त आणि साखर किंवा दूध कमी असते. त्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, लोह, ग्नेशियम सारख्या अनेक आवश्यक षिकतत्वांचा समावेश असतो. परंतु त्यात कॅफिन आणि थियोब्रोमाइन देखील असते, या दोन गोष्टी चव बाढवतात, पण झोप बिघडू शकतात.
कॅफिनचा झोपेवर थेट परिणाम डार्क चॉकलेटमध्ये असलेले कॅफिन कॉफीमध्ये देखील आढळते. जे दोन्ही मेंदूला सतर्क ठेवते. जेव्हा तुम्ही कॅफिनचे सेवन करता तेव्हा ते तुमच्या मेंदूमध्ये तयार होणाऱ्या मेलाटोनिन नावाच्या झोपेला चालना देणाऱ्या हार्मोनचे प्रमाण कमी करते. मेलाटोनिन हा हार्मोन आपल्या शरीराला झोपेची वेळ झाली आहे हे सांगणारा हामर्मोन आहे. जेव्हा कॅफिन ते दाबते तेव्हा झोप येण्यास वेळ लागू शकतो.
झोप कशी बिघडते?
डार्क चॉकलेटयामध्ये थियोब्रोमाइन आढळून येते जे झोपेची गुणवत्ता बिघडवते. थियोब्रोमाइन हे एक उत्तेजक आहे जे हृदयाचे ठोके जलद करते आणि शरीराला सतर्क स्थितीत आणते. डार्क चॉकलेटचे आरोग्यदायी फायदे असले तरी, झोपेच्या वेळेस त्याचे सेवन करणे हानिकारक ठरू शकते.यामुळेच झोपेच्या आधी डार्क चॉकलेटचे सेवन करणे टाळा आणि शांत झोपेची मजा लुटा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.