Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा जवळ आल्या? मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरा या सोप्या स्टडी टिप्स

Study Tips : परीक्षा जवळ आल्या की मुलांबरोबरच पालकांचीही चिंता वाढते. अनेकदा मुलं अभ्यास करतात पण वाचलेलं लक्षात राहत नाही. अशा वेळी योग्य अभ्यासपद्धती आणि काही सोप्या सवयींच्या मदतीने मुलांची स्मरणशक्ती वाढवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 10, 2026 | 08:15 PM
परीक्षा जवळ आल्या? मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरा या सोप्या स्टडी टिप्स

परीक्षा जवळ आल्या? मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वापरा या सोप्या स्टडी टिप्स

Follow Us
Follow Us:
  • मुलांना घोकंपट्टी करण्याऐवजी धडा समजून घेऊन आपल्या भाषेत सांगण्याचा सराव करायला सांगा.
  • वाचन करताना धड्यातील महत्त्वाचे मुद्दे मार्क केल्यास ते लक्षात ठेवणे सोपे होते.
  • रोज शाळेत शिकलेल्या गोष्टींबद्दल मुलांशी चर्चा केल्यास अभ्यास सहज लक्षात राहतो.
आजच्या स्पर्धात्मक शिक्षणपद्धतीत मुलांवर अभ्यासाचा ताण वाढत चालला आहे. विशेषतः परीक्षा जवळ आल्या की मुलांबरोबरच पालकांचीही चिंता वाढते. अनेकदा मुलं खूप वेळ अभ्यास करतात, पण तरीही वाचलेलं लक्षात राहत नाही किंवा परीक्षेत लिहिताना आठवत नाही. त्यामुळे “इतका अभ्यास करूनही पाठ का होत नाही?” असा प्रश्न पालकांना पडतो.

कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

खरं तर मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी केवळ जास्त वेळ अभ्यास करणे पुरेसे नसते, तर योग्य पद्धतीने अभ्यास करण्याची सवय लावणे अधिक महत्त्वाचे असते. अभ्यास मजेदार, समजून घेऊन आणि नियोजनबद्ध पद्धतीने केला तर मुलांना गोष्टी लवकर लक्षात राहतात. म्हणूनच पालकांनी मुलांना घोकंपट्टी करण्याऐवजी समजून घेऊन शिकण्याची सवय लावली, तसेच काही सोप्या स्टडी टिप्सचा वापर केला तर मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते आणि परीक्षेची भीतीही कमी होऊ शकते. पुढील काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही मुलांच्या अभ्यासातील ही समस्या सहज दूर करू शकता.

‘अ‍ॅक्टरेक’च्या प्रोटॉन थेरपीचा कर्करुग्णांना दिलासा! आतापर्यंत एकूण ९०० रुग्णांवर उपचार, ४०० हून अधिक लहान मुलांचा समावेश

स्टडी टिप्स

  • मुलांना रात्री झोपताना निर्यात पडल्यावर दीर्घश्वसन करून वाचलेल्या सर्व गोष्टी आठवण्याची सवय लावा.
    मुले जर एकच उत्तर अनेक वेळा वाचत बसली असतील तर त्यांना ते उत्तर शांत चित्ताने एकदाच वाचायला सांगून आठवेल तितके उत्तर न बघता लिहिण्याचा सराव घ्या.
  • मुलांची घोकंपट्टी करण्याची खोड मोडायची असेल तर त्यांना ती धडा किंवा उत्तर समजून घेऊन त्याचे आपल्या भाषेत विषण करण्यास सांगा,
  • भाषेच्या विषयांचा अभ्यास करताना संपूर्ण धडा गोष्टीस्वरूपात त्यांना समजावून सांगा. म्हणजे त्याविषयी आलेल्या कोणत्याही अवांतर प्रश्नाचे उत्तर ते सहज सोडवू शकतील.
  • मुलांना दमटावून अभ्यासाला बसवले तर ते रुची घेऊन एकाग्रतेने वाचणार नाहीत. त्यासाठी आधी त्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा.
  • मुलांशी रोज न विसरता शाळेत शिकवलेल्या अभ्यासासंबंधी हसत खेळत चर्चा करा. त्यामुळे परीक्षेचा अभ्यास करताना त्यांना त्या गोष्टी नवीन वाटणार नाहीत.
  • वाचन करताना मुलांना धड्‌यातले किंवा उत्तरातले महत्त्वाचे मुद्दे हायलाइंट करण्याची सवय लावा. जेणेकरून वाचन करताना ते सहज डोळ्यांसमोर येतील व लक्षातही राहतील.
  • धड्यातले एखादे महत्त्वाचे नाव लक्षात राहत नसेल तर त्या शब्दाला यमक जुळेल असा शब्द किंवा एखादी आठवण लक्षात ठेवावी. ज्यामुळे उत्तर लिहिताना तो शब्द न अडता पटकन आठवेल.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Study tips to improve kids memory for exams lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • brain
  • lifestyle news
  • lifestyle tips
  • study

संबंधित बातम्या

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास
1

History Of Clothes Size: कपड्यांची M, L, XL साईज नक्की कधी सुरू झाली, मनोरंजक इतिहास

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल
2

Health Care Tips: स्मृतिभ्रंशावर नियमित योग अधिक प्रभावी! १२ आठवड्यांपर्यंत दररोज ६० मिनिटे योगसत्रामुळे बदल

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा
3

चपात्या दिर्घकाळ मऊ राहत नाही? शिप्रा रायने शेअर केला घरगुती उपाय, चपातीच्या डब्यात वाटी ठेवा अन् कमाल बघा

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत
4

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.