उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या 'या' अवयवांना मिळते भरपूर पोषण
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये बाजारात अननस उपलब्ध असतात. चवीला आंबट गोड असलेले अननस सगळ्यांचं खूप आवडतात. यामध्ये विटामिन सी, विटामिन बी६, मॅंगनीज, पोटॅशियम, फोलेट आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. आहारात अननसाचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अननस हे फळ आरोग्यासाठी वरदान मानले जाते. कारण यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा, हृद्य आणि शरीरातील इतर अवयव निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला अननस खाल्यामुळे शरीराच्या कोणत्या अवयवांना फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.त्यामुळे आहारात नेहमी अननस खावे.(फोटो सौजन्य – iStock)
किडनी फेल झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात ‘हे’ गंभीर बदल, लक्षणे दिसताच डॉक्टरांचा घ्या सल्ला
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे हृदय. हृदयाचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या फळांचे, भाज्यांचे सेवन केले जाते. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. हार्ट अटॅक आणि कोलेस्ट्रॉल सारख्या जीवघेण्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात नेहमी अननस खावे. यामध्ये असलेली पोषक तत्व हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात.
शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे आतड्यांच्या आरोग्य बिघडू लागते. यामुळे पचनक्रिया बिघडणे, वारंवार अपचनाची समस्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात अननस किंवा अननसाच्या रसाचे सेवन करावे. पोटाच्या समस्यांपासून कायमचा अराम मिळवण्यासाठी अननस खावे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. मात्र कोणतेही चुकीचे पदार्थ खाण्याऐवजी अननस खावे. यामुळे शरीरातील घाण स्वच्छ होईल.
राज्यासह संपूर्ण देशभरात वातावरणात अनेक बदल झाले आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे साथीचे आजार वाढून शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आहारात अननस खावे. यामध्ये आढळून येणाऱ्या विटामिन सी मुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय तुम्ही जर वारंवार आजारी पडत असाल तर आहारात अननस खावे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल.
बऱ्याचदा वाढत्या उष्णतेमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी अननस खावे. याशिवाय तुम्ही आहारात अननसचा रस सुद्धा पिऊ शकता. यामुळे शरीरात पाण्याची पातळी वाढते आणि डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. उष्माघाताच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी अननस खावे.