
सकाळच्या नाश्त्यात 'हे' पदार्थ खाल्ल्यास दीर्घकाळ राहील पोट भरलेले
रात्रीच्या जेवणात ठराविक पदार्थांचे सेवन केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर खूप जास्त भूक लागते. सकाळच्या नाश्त्यात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. काहींना चहासोबत बिस्कीट खाण्याची सवय असते तर काहींना चहाब्रेड, टोस्ट खाण्याची सवय असते. पण या पदार्थांमध्ये असलेल्या यीस्टमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात शरीरास ऊर्जा देणाऱ्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळी पोटभर नाश्ता केल्यास लवकर भूक लागत नाही. तुमचा दिवस आनंद आणि उत्साहाने जातो. सकाळच्या घाईगडबडीत बहुतांश वेळा आपण पटकन तयार होणारा नाश्ता निवडतो. मात्र, सकाळी आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या पचनसंस्थेवर, ऊर्जेवर आणि दिवसभर लागणाऱ्या भुकेवर होत असतो, अनेकदा आरोग्यदायी वाटणाऱ्या काही पदार्थांचा आतून आपल्या गट हेल्थवर नकारात्मक परिणामही होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या ४० नंतर आहारात करा ‘या’ पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक
अंड्यांमध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते, जे शरीराला सहज पचते. अंडी खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही. गट हेल्थ आणि मेटाबॉलिझमसाठी अंडी उत्कृष्ट नाश्ता मानले जातात.
ग्रीक योगर्टमध्ये भरपूर प्रोटीन असतं आणि त्यातील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. मात्र, साखर मिसळलेलं फ्लेवर्ड योगर्ट टाळावं, कारण त्यामध्ये जास्त साखर असते, जी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
ओट्स हा देखील चांगला नाश्त्याचा पर्याय आहे. ओट्समध्ये असलेला बीटा-ग्लूकान फायबर गट हेल्थसाठी फायदेशीर असून ऊर्जा हळूहळू सोडण्यास मदत करतो. मात्र, इंस्टंट ओट्सपेक्षा स्टील-कट किंवा रोल्ड ओट्स निवडणं अधिक चांगलं, कारण जास्त प्रक्रिया झालेल्या ओट्समुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.
एवोकाडो टोस्टमध्ये असलेले हेल्दी फॅट्स आणि फायबर पोट भरलेलं ठेवतात आणि पचनसंस्थेला आधार देतात. यासोबतच पनीर म्हणजेच कॉटेज चीजही उत्तम नाश्त्याचा पर्याय आहे. इडली-डोसा आणि इतर पर्याय याशिवाय स्मूदी, पीनट बटर तसेच इडली-डोसा है नाश्त्यासाठी मध्यम स्वरूपाचे पर्याय असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
Ans: सकाळचा नाश्ता दिवसभर काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देतो, चयापचय सुधारतो आणि मूड चांगला ठेवण्यास मदत करतो.
Ans: पोहे, उपमा, इडली, डोसा, मूग डाळीचे धिरडे, ओट्स, फळे
Ans: जास्त साखर असलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न, तळलेले पदार्थ आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळावेत