रक्तवाहिन्यांमध्ये घाणेरडे कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात 'ही' लक्षणे
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोणत्या कारणांमुळे रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते?
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येणारी लक्षणे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक घटकांचा अभाव, बिघडलेली पचनक्रिया आणि वारंवार उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित समस्यांमुळे शरीराची स्थिती पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे कायमच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकांना सतत जंक फूड, चायनीज आणि इतर तिखट तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यातील अतिशय भयंकर समस्या म्हणजे रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल. रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या आरोग्याला हानी पोहचते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चरबीचा चिकट पिवळ्या रंगाचा थर रक्तवाहिन्या ब्लॉक करून टाकतो.(फोटो सौजन्य – istock)
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर हृदयाला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्याच्या परिणामामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा हार्ट स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेल्या कोलेस्ट्रॉकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणत्याही क्षणी जीव ज जाऊ शकतो. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर केवळ छातीमध्येच नाहीतर चेहऱ्यावर सुद्धा लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांभोवती पिवळे डाग वाढू लागतात. हे डाग हळूहळू अतिशय गडद होतात. उच्च कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या भयंकर लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेऊन आरोग्याची काळजी घ्यावी. डोळ्यांभोवती वाढलेल्या पिवळ्या डागांच्या समस्यांना झेंथेलास्मा असे सुद्धा म्हंटले जाते.
कोणत्याही कारंणाशिवाय तुमच्या त्वचेवर पुरळ किंवा पिंपल्स येत असतील तर ही सामान्य समस्या नाही. तेलकट त्वचा, हार्ट ब्लॉकेज आणिउच्च कोलेस्ट्रॉलने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर पुरळ येण्याची शक्यता असते. शरीरात जमा झालेल्या फॅटमुळे ही लक्षणे दिसतात. याशिवाय काहींची त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते.
उच्च कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डोळ्यांच्या कॉर्नियाभोवती पांढरा किंवा ग्रे रंगाचा थर जमा होण्यास सुरुवात होते. हे थर वाढत्या वयात सुद्धा येतात. पण उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर डोळ्यांभोवती दिसणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज आल्यासारखे वाटणे हे सुद्धा उच्च कोलेस्ट्रॉलचे गंभीर लक्षण आहे.
Ans: एक मेणासारखे पदार्थ आहे जे तुमच्या रक्तामध्ये असते. शरीर पेशी तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी कोलेस्टेरॉल वापरते.
Ans: वाईट कोलेस्टेरॉल, चांगले कोलेस्टेरॉल
Ans: त्वचेवर फॅटी गाठी , छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, थकवा, घाम येणे.






