वयाच्या ४० नंतर आहारात करा 'या' पदार्थांचा नियमित समावेश, हाडे राहतील लोखंडाइतकी मजबूत आणि कडक
कॅल्शियम वाढवण्यासाठी काय खावे?
उतार वयात हाडे ठिसूळ होण्याची कारणे?
हाडांमध्ये वेदना कशामुळे होतात?
वय वाढल्यानंतर महिलांसह पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या ४० नंतर शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, मानसिक तणाव, मासिक पाळीसंबंधित समस्या, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.चाळिशीनंतर शरीरातील स्नायू झिजण्यास सुरुवात होते. या समस्येला वैद्यकीय भाषेत सार्कोपेनिया असे म्हणतात. शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण झाल्यानंतर हाडे कमकुवत होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि थकवा जाणवणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवतात. त्यामुळे वाढत्या वयात शरीराला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन मिळेल.(फोटो सौजन्य – istock)
अंड्यामध्ये असलेले प्रोटीन आणि प्रथिने शरीराला भरपूर पोषण देतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नियमित दोन अंडी खावीत. अंड्यातील प्रथिने शरीर सहज शोषून घेतो, ज्यामुळे स्नायू दुरुस्त होतात आणि झिजलेले स्नायू मजबूत होण्यास मदत होते. शरीरातील प्रथिनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अंड्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले अमिनो ॲसिड्स शरीराला लगेच ऊर्जा देते.
शरीराची ऊर्जा वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात नियमित दही खावे. दह्याचे सेवन केल्यामुळे शरीराला प्रोबायोटिक्स मिळतात. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी दह्याचे सेवन करावे. दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटिक्समुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. दह्यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. वयाच्या चाळिशीनंतर महिलांची हाडे सगळ्यात जास्त ठिसूळ होतात. याचा जास्त परिणाम महिलांच्या आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे उतार वयात शरीराला पोषण देण्यासाठी पनीर आणि टोफूचे सेवन करावे. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने हाडे मजबूत करतात.






