Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? जाणून घ्या यामागचं सत्य

Health Tips: श्रावण आणि सणासुदीच्या काळात हातावर मेहंदी काढण्याची परंपरा मोठ्या उत्साहाने पाळली जाते. मेहंदी लावल्यानंतर त्या हाताने जेवणे धोकादायक आहे, असे सरसकट म्हणता येत नाही. शुद्ध नैसर्गिक मेहंदी सामान्यतः त्वचेवर वापरण्यास सुरक्षित मानली जाते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 21, 2026 | 02:45 PM
Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Health Tips: मेहंदीच्या हाताने जेवणं खरंच धोकादायक? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नैसर्गिक मेहंदी लावून जेवल्याने सरसकट आरोग्याला धोका होत नाही.
  • ‘ब्लॅक मेहंदी’मधील PPDसारख्या रसायनांपासून सावध राहा.
  • जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आणि मेहंदी अन्नाला लागू न देणे महत्त्वाचे.
 

Eating After Applying Mehendi: श्रावण आला की सणांची चाहूल लागते आणि त्यासोबत हातावर मेंहदी काढण्याची लगबगही सुरु होते. लग्न असो, मंगळागौर असो किंवा एखादा खास कार्यक्रम मेंहदीशिवाय हा आनंद अपुरा वाटतो. पण मेंहदी काढल्यानंतर एक छोटासा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या हाताने जेवण केलं तर काही त्रास होतो का? Health Tips:

नैसर्गिक मेंहदी असेल तर?

खरी आणि नैसर्गिक मेहंदी हिना या वनस्पतीच्या पानांपासून तयार केली जाते. साधारणपणे शुद्ध मेंहदीच्या त्वचेवर वापर केल्याने मोठा धोका निर्माण होत नाही. त्यामुळे केवळ हातावर नैसर्गिक मेहंदी आहे, म्हणून जेवन केल्याने आजार होतो, असं सरसकट म्हणता येणार नाही.

मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. बाजारात मिळणारी प्रत्येक मेहंदी नैसर्गिक असेलच असं नाही. मेहंदीचा रंग पटकन यावा आणि तो अधिक गडद दिसावा यासाठी काही उत्पादनांमध्ये रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे हातावर काय लावलं जात आहे, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

काळ्या मेंहदीपासून सावधान!!!

मेहंदी जेवढी काळी रंगते तेव्हीच ती जास्त सुंदर वाटते. अश्यासाठी मुली अनेकवेळा बाजारातून काळी रंगणारी मेहंदी आणतात. मात्र या मेहंदीमध्ये PPD (Para-phenylenediamine) सारखी रसायने असतात. जे त्वचेवर तीव्र प्रतिक्रिया दिसू शकतात.

अनेकदा मेहंदी लावल्यानंतर खाज सुटणे, लाल चट्टे येणे, त्वचा जळजळणे, सूज येणे, उठणे अशी लक्षणे दिसतात. याकडे आपण दुर्लेक्ष करतात, मात्र आपण याकडजे दुर्लेक्ष करु नये. नेहमी कोणतीही एका प्रकारची मेहंदी वापरावी. अशा रासायनिक मेहंदीचा हाताने अन्नाशी वारंवार संपर्क होत असेल, तर स्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होतो.
हातावर मेहंदी असताना जेवण केल्यामुळेच अन्नातून विषबाधा होते, असं नाही. अनेकदा समस्या हात स्वच्छ न धुतल्यामुळे निर्माण होते.

मेहंदी सुकत असताना तिच्यावर धूळ बसू शकते. त्यातच आपण दिवसभर अनेक वस्तूंना हात लावतो. मोबाईल, दरवाजाचे हँडल, पैसे, टेबल किंवा इतर वस्तूंवर असलेले जंतू हाताला लागू शकतात. हात व्यवस्थित न धुता जेवण केल्यास हे जंतू अन्नासोबत शरीरात जाऊ शकतात.

यामुळे पोटदुखी, उलटी, जुलाब किंवा पोट बिघडण्यासारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे ‘मेहंदी लावली म्हणून आजार झाला’ असा निष्कर्ष काढण्यापेक्षा हातांची स्वच्छता किती आहे, हे पाहणं गरजेचं आहे.

मेहंदी लावल्यानंतर काय काळजी घ्याल?

मेहंदी काढल्यानंतर लगेचच हाताने जेवण्याची घाई करू नका. मेहंदी पूर्णपणे सुकू द्या आणि हात स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जेवण्याआधी साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुणं हा सर्वात सोपा आणि महत्त्वाचा उपाय आहे.

बोटांच्या मधला भाग, नखांच्या आसपासची जागा आणि तळहात व्यवस्थित स्वच्छ करायला विसरू नका. मेहंदीचा रंग पूर्णपणे निघालेला नसेल तरी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नये.

मेहंदी किंवा डाय न वापरता पांढरे केस काळे कसे करायचे? योगगुरू ‘नित्यानंदम श्री’ने शेअर केला नॅचरल उपाय

स्वयंपाक करताना मेहंदीचा ओला भाग अन्नाला लागू नये, याचीही काळजी घ्या. विशेषतः मेहंदी नुकतीच लावलेली असेल तर थेट अन्न हाताळण्याऐवजी शक्य असल्यास दुसऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी.

त्रास जाणवला तर दुर्लक्ष नको

मेहंदी लावल्यानंतर त्वचेवर सतत खाज, जळजळ, सूज, लालसरपणा किंवा फोड दिसत असतील, तर घरगुती उपाय करत बसण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

थोडक्यात सांगायचं तर, शुद्ध नैसर्गिक मेहंदी आणि स्वच्छ हात यामध्ये मोठी अडचण नसते. मात्र रसायनयुक्त मेहंदी, विशेषतः संशयास्पद ‘ब्लॅक मेहंदी’, वापरताना सावध राहणं गरजेचं आहे. सणाचा आनंद घेताना हातावरची मेहंदी सुंदर दिसणं महत्त्वाचं आहेच; पण तिच्यासोबत स्वच्छता आणि सुरक्षिततेची काळजी घेणं त्याहून महत्त्वाचं आहे.

Web Title: Eating with mehendi applied hands is it dangerous know the truth and safety tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • lifestlye tips

संबंधित बातम्या

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास
1

Best Fan Speed While Sleeping: झोपताना पंखा किती स्पीडवर ठेवावा? ‘ही’ चूक केल्यास झोप होण्याऐवजी होईल त्रास

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
2

October Heat: ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय? उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
3

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज
4

Health Care Tips: हातापायांना कायमच सूज येते? किडनीपासून हृदयापर्यंत ‘या’ कारणांमुळे पायाला येऊ शकते सूज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.