Recipe : शिमला मिरचीची बोरींग भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर यावेळी गावराण पद्धतीची भरली शिमला मिरची बनवून पाहा. ही डिश भाकरी किंवा चपातीसोबत फार लज्जतदार लागते आणि रात्रीच्या जेवणासाठी ए
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
गावाकडे भरलेली शिमला मिरची फार आवडीने खाल्ली जाते.
शिमला मिरचीची भाजी आवडत नसल्यात तुम्ही ही रेसिपी ट्राय करु शकता.
फार झटपट आणि कमी वेळेत रेसिपी तयार होते.
शिमला मिरचीची भाजी नेहमीच्या पद्धतीने खाण्यापेक्षा तिच्यात मसालेदार आणि झणझणीत गावरान सारण भरून केली, तर साध्या जेवणाची चवच बदलून जाते. भाजलेल्या शेंगदाण्याचा खमंगपणा, खोबऱ्याची चव, कांदा आणि खास घरगुती मसाल्यांचा तिखट-झणझणीत स्वाद यामुळे ही भरलेली शिमला मिरची अतिशय रुचकर लागते. गावाकडच्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी गरमागरम भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत छान लागते. विशेष म्हणजे सारण आधी हलके भाजून घेतल्यामुळे त्याचा सुगंध आणि चव अधिक खुलते. चला रेसिपीनोट करून घेऊयात.