(फोटो सौजन्य: istock)
पांढरे केस हे म्हातारपणाचे लक्षण मानले जाते. अशात कमी वयात केस पांढरे होणे लाजीरवाणे ठरते. कुणालाही पांढरे केस फारसे आवडत नाही, ज्यामुळे लोक पार्लरमध्ये जाऊन आपले पांढरे केस काळे करुन घेतात. काहीजण काळे केस करण्यासाठी मेहंदीचा वापर करतात तर काहीजण डायचा वापर करुन पांढरे केस काळे करतात. परंतु अनेकदा डाय किंवा केमिकलयुक्त मेंहदीच्या वापरामुळे आपले केस आणखी डॅमेज होण्याची शक्यता असते. याच समस्येकडे लक्ष देता योगगुरु नित्यानंदम श्री यांनी युट्युब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना मेहंदी आणि डायचा वापर न करता केसांना नैसर्गिकरित्या पांढरे कसे केले जाऊ शकते याची ट्रिक शेअर केली आहे.
केसांना नॅचरली काळे कसे करायचे?
व्हिडिओमध्ये आपला अनुभव शेअर करताना नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती जेव्हा त्यांच्या डोक्यावरचे जवळपास २० टक्के केस पांढरे झाले होते. सुरुवातीला त्यांनीही केस काळे करण्यासाठी मेहंदीचा वापर केला पण याचा त्यांच्या केसावर फार काही परिणाम दिसून आला नाही. उलट यामुळे त्यांचे केस थोडे कोरडे वाटू लागले. त्यानंतर, त्यांनी आपल्या आहारात आणि केसांच्या निगा राखण्याच्या नित्यक्रमात काही विशिष्ट घटकांचा समावेश केला.
आवळ्याचा वापर फायदेशीर
योगगुरु नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, केसांना काळे करण्यासाठी त्यांनी आपल्या आहारात आवळ्याचा समावेश केला. ते रोज वेगवेगळ्या प्रकारे आवळ्याचा आहारात समावेश करु लागले. यापासून कधी ते आवळा ज्यूस बनवायचे, कधी आवळ्याची चटणी तर कधी कच्चा आवळा… नित्यानंदम श्री यांच्या मते, आवळ्याचा आहारात समावेश केल्याने केसांवर निश्चितच चांगला परिणाम दिसून येतो. ते आठवड्यातून दोनदा केसांवर आवळ्याच्या तेलाने मालिश देखील करायचे.
नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेला हेअर मास्क
आवळ्याव्यतिरिक्त, नित्यानंदम श्री कधीकधी आपल्या केसांवर दही, बदामाचे तेल, तिळाचे तेल आणि ताज्या कोरफडीच्या जेलपासून बनवलेला हेअर मास्क देखील लावतात. हा मास्क नैसर्गिक कंडिशनरसारखा काम करतो.
डाएटवर दिले लक्ष
नित्यानंदम श्री यांनी सांगितले की, या नैसर्गिक उपायासोबतच त्यांनी आपल्या आहारावरही विशेष लक्ष दिले. त्यांनी आपल्या आहारात तूप, गाजर आणि इतर पोषक घटकांचा समावेश केला. योगगुरु यांनी सांगितले की, नैसर्गिक उपायांच्या मदतीने ५ ते ६ महिन्यांत परिणाम दिसायला सुरुवात होते. त्यामुळे संयम ठेवा आणि नित्यनियमाने नैसर्गिक उपायांचा वापर करा. या टीप्सचा वापर जर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात केला तर नैसर्गिकरित्या मुळापासून तुमचे केस काळे होण्यास मदत होईल.






