Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अपचन आणि ॲसिडीटीवर प्रभावी ठरतील ‘या’ गुणकारी बिया, पोटातील आतड्या होतील स्वच्छ

पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषध घेतात. मात्र या गोळ्या खाल्ल्यामुळे काहीकाळ आराम मिळतो. पण पुन्हा ॲसिडीटी, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही आहारात जिरं, बडीशेप किंवा ओव्याचे पाणी पिऊ शकता. आज आम्ही तुम्हाला बडीशेपचे पाणी कसे तयार करावे आणि हे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2024 | 09:50 AM
बडीशेप खाल्याने आरोग्याला होणारे फायदे

बडीशेप खाल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

काहीवेळा सतत तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे अपचन किंवा गॅस होण्याची शक्यता असते. काहींना सतत बाहेरचे तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाण्याची सवय असते. पण हे पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला बिघडू शकते. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर डॉक्टरांकडून घेतलेल्या गोळ्या औषधांपेक्षा घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. आयुर्वेदामध्ये पोटासंबंधित आजारांवर अनेक घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत. काहींना जेवल्यानंतर किंवा इतर वेळी बडीशेप किंवा जिरं खाण्याची सवय असते. हे पदार्थ खाल्यामुळे जेवलेले अण्णा व्यवस्थित पचण्यास मदत होते. या बियांचे सेवन केल्यामुळे पचनसंबंधित समस्या उद्भवत नाहीत.

बडीशेपमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. तसेच मॅग्नेशियम, झिंक, पोटॅशियम, सेलेनियम, विटामिन सी, विटामिन ई आणि विटामिन के, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण जास्त असते. बडीशेप पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. बडीशेपचे सेवन केल्यामुळे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात होणारी जळजळ कमी होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बडीशेप खाल्ल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: निरोगी फुफुस्स आणि धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस? काय असतो फरक? जाणून घ्या

ॲसिडीटी होण्याचे मुख्य कारण:

ॲसिडीटी होण्यामागे अनेक कारण आहेत. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे ॲसिडीटी वाढण्याची शक्यता असते. हे पदार्थ खाल्यामुळे पोटात अमल पित्त तयार होते. ज्यामुळे शरीरात जळजळ होणे, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. मटार, फ्लॉवर, भेंडी, वांग, कडधान्य यांसारख्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे पोटात ॲसिडीटी निर्माण होते. तसेच तिखट किंवा तेलकट कोणतेही पदार्थ खाऊन दूध प्यायल्यास ॲसिडीटी वाढण्याची शक्यता असते.

बडीशेपचे सेवन कधी आणि किती प्रमाणात करावे:

बडीशेप, जिरं किंवा ओवा खाल्यामुळे शरीर निरोगी राहते. या बियांचे पाणी करून तुम्ही रिकाम्या पोटी पायस शकता. ज्यामुळे शरीरातील साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होईल. पण या बियांचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. कारण अतिप्रमाणात सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकते. बडीशेपसह इतर बियांचे नियमित सेवन केल्यास आतड्यांच्या समस्या दूर होतात आणि आतड्या स्वच्छ राहण्यास मदत होते.

हे देखील वाचा: फळं की ज्यूस कशात असते जास्त शक्ती आणि न्यूट्रिएंट्स? जाणून घ्या

पचनक्रिया सुधारते:

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी बडीशेप बियांच्या पाण्याचे सेवन करावे. या बिया बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. या बियांचे पाणी बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप पाण्यात टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करा. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Effective home remedies for acidity healthy benefits of eating fennel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 09:50 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट
1

उपाशी पोटी कोमट पाणी प्यावे की थंड पाणी? वजन कमी करण्यासाठी फॉलो करा जपानी वॉटर थेरपी, स्वच्छ होईल पोट

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी
2

यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे हातापायांमध्ये वेदना होतात? मग रोजच्या आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, राहाल कायमच हेल्दी

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल
3

ओटीपोटात कायमच तीव्र वेदना जाणवतात? अंडाशयाच्या कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ मोठे बदल

तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत
4

तरुण वयात हाडांमधून सतत आवाज येतो? मग आहारात करा ‘या’ कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश, ठिसूळ हाडे होतील मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.