मानवाच्या श्वसनक्रियेमध्ये फुफुस्साचा फार मोठा योगदान असतो. एकंदरीत, फुफुस्साशिवाय जगणे अशक्य आहे. जगण्यासाठी फार महत्वाचे असतात. परंतु, मानव यांना दूषित करण्यास एक कारण नाही सोडत आहे. धूम्रपान केल्याचा यांवर फार मोठा दुष्परिणाम होतो. धूम्रपान केल्याने फुफुस्साचा रंग काळसर होतो. फुफुस्साची कार्यक्षमता बिघडते. परिणामी, श्वास घेण्याचा त्रास होतो, तसेच अस्थमा, दम्यासारखे विकार उदभवतात. त्यामुळे, यांची काळजी घेणे फार महत्वाचे असते. धूम्रपान करत असाल तर आजपासूनच याला थांबवा. जाणून घ्या, निरोगी फुफुस्स आणि धूम्रपान करणाऱ्यांचे फुफ्फुस यामध्ये फरक नेमकं काय असतं?
निरोगी आणि धूम्रपान करणाऱ्या फुफुसांमध्ये खालीलप्रमाणे फरक असतो. ( फोटो सौजन्य - Social Media )
निरोगी फुफ्फुस गुलाबी रंगाचे असतात, ज्यामुळे ते स्वच्छ आणि कार्यक्षम दिसतात.
निरोगी फुफ्फुसाला कोणतीही सूज नसते, त्यामुळे श्वास घेण्यास कोणतीही अडचण नसते.
निरोगी फुफ्फुस सामान्य आकाराचे असतात, जे शरीराच्या योग्य श्वसनासाठी मदत करतात.
धूम्रपान केल्याने फुफ्फुस राखाडी किंवा काळ्या रंगाचे होतात, धूम्रपानामुळे टॉक्सिन्स जमा होतात.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या फुफ्फुसाला सूज असते, जी फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी करते.
धूम्रपान करणारे फुफ्फुस अधिक फुगलेले असतात, ज्यामुळे श्वासोच्छवासात अडचण येते.