चेहऱ्यावर वाढलेल्या पिगमेंटेशनमुळे त्वचा निस्तेज दिसते? मग नक्की करून पहा 'हे' घरगुती उपाय
तेज कमी होऊन जाते. उन्हात बाहेर जाताना सनस्क्रीन न लावणे, त्वचा व्यवस्थित स्वच्छ न करणे, वातवरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम, ऊन, वाढती थंडी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. यामुळे चेहऱ्यावर पाळ, हनुवटी, डोळे आणि कानाच्या मधला भागांवर पिगमेंटेशन वाढू लागतात. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. चेहऱ्यावर वाढलेल्या पिगमेंटेशनमुळे त्वचेचे सौंदर्य होऊन जाते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेले पिगमेंटेशन घालवण्यासाठी बटाट्याचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफ घेण्याच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल आतून स्वच्छ
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि काळे डाग कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा आतून स्वच्छ होते. याशिवाय चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून पचनक्रिया निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. पचनक्रियेत बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी बटाट्याचा वापर करावा. यासाठी बटाट्याची साल काढून तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून त्यातील रस काढा. काढून घेतलेला रस काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्याच्या वरील पाणी काढून स्टार्च तसेच ठेवा. स्टार्च त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरतील.
बटाट्यांमधील रस कापसाच्या गोळ्यांचे संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. यामुळे त्वचा खूप जास्त हायड्रेट होईल आणि चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होईल. याशिवाय तुम्ही त्यात विटामिन ई कँप्सूल आणि कोरफड जेल सुद्धा मिक्स करू शकता. कोरफड जेल त्वचा हायड्रेट ठेवते. याशिवाय त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जातो. बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर काहीवेळाने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित न चुकता केल्यास चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, टॅनिंग आणि सुकूत्या कमी होण्यास मदत होईल. चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बटाट्याचा रस प्रभावी ठरतो.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. यामुळे आठवडाभरात त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाब पाणी अतिशय गुणकारी ठरते. गुलाब पाण्याचा वापर मागील बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे. महिलांच्या त्वचेसाठी गुलाब पाणी वरदान मानले जाते.






